सामाजिक वनीकरणाने केली ८३ हजार रोपांची लागवड

By admin | Published: September 5, 2014 12:29 AM2014-09-05T00:29:20+5:302014-09-05T00:29:20+5:30

बुलडाणा जिल्ह्यात १ कोटी वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट; ८३ हजार ७५0 झाडे लावली आहेत.

83 thousand plantations have been planted by social forestry | सामाजिक वनीकरणाने केली ८३ हजार रोपांची लागवड

सामाजिक वनीकरणाने केली ८३ हजार रोपांची लागवड

Next

बुलडाणा : पर्यावरणाचा होणारा र्‍हास रोखण्यासाठी राज्य शासनाने वृक्ष लागवडीची धडक मोहीम हाती घेऊन शतकोटी योजनेंतर्गत जिल्ह्यात १ कोटी वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. सामाजिक वनीकरणाने या योजने अंतर्गत यावर्षी ८३ हजार ७५0 झाडे लावली आहेत. सामाजिक वनीकरणाने ४ लाख ४0 हजार रोपांची निर्मिती केली होती; मात्र यावर्षी उशिरा पाऊस आल्याने त्याचा फटका वृक्ष लागवडीला बसला आहे.
सन २0१३ पासून राज्य शासनाने शतकोटी वृक्ष लागवड योजना सुरू केली. जिल्हा परिषद, सामाजिक वनीकरण, कृषी विभाग, वन विभाग या सोब तच रोहयो योजने अंतर्गतसुद्धा ही योजना राबविण्यात येत आहे. पावसाळ्यापूर्वीच या सर्व विभागाला वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिल्या जाते. त्यानुसार खड्डे खोदून ठेवल्या जातात. यासाठी रोपांची निर्मिती केली जाते. बुलडाणा जिल्ह्यात १३ तालुक्यात असलेल्या १२७ रोपवाटिकेमधून रोपे पुरविल्या जा त आहेत. सामाजिक वनीकरणाच्या जिल्ह्यात १२ ठिकाणी रोपवाटिका आहेत. यावर्षी या रोपवाटिकांमध्ये ४ लाख ४0 हजार ५७२ रोपे तयार करण्यात आली. यापैकी १ लाख २५ हजार रोपांचे वाटप केले तर ८३ हजार ७५0 रोपे सामाजिक वनीकरणाने जिल्हाभरात रस्त्याच्या कडेला, स्मशानभूमी, शाळा, मंदिरे, मोकळी जागा आणि शासकीय कार्यालय तसेच ग्रामपंचायतीच्या आवारात या वृक्षांचे रोपन केले. मागील वर्षी सामाजिक वनीकरणाला १ लाख ३0 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यापैकी ७३ हजार रोपांची लागवड करण्यात आली होती.

** पावसाचा फटका
यावर्षी अर्धा पावसाळा कोरडा गेला. जून, जुलै महिन्यात या रोपांची लागवड होणे अपेक्षित होते; मात्र पाऊस न आल्याने तब्बल दोन महिने उशिरा रो पांची लागवड झाली. काही भागात जून, जुलै महिन्यात वृक्ष लागवड केली होती; मात्र पावसाअभावी ही रोपे करपून गेली. ऑगस्ट महिन्यात सुरू झालेल्या पावसाने आता रस्त्यालगतची झाडे चांगल्या प्रकारे उगवली आहेत.

** तालुकानिहाय रोपांची लागवड
मेहकर-             ६000
देऊळगावराजा-  ८४00
बुलडाणा -          ४७00
खामगाव -         ७000
शेगाव -             ५000
लोणार -            ६८00
जळगाव जा.-  १0000
संग्रामपूर -        २८00
सिंदखेडराजा-    ९४00
मलकापूर -       ६000
नांदुरा -            ५000
चिखली -        १0000

Web Title: 83 thousand plantations have been planted by social forestry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.