धान्य वितरण बारदान्यापोटी जिल्ह्याला ८४ लाखांचा चुना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2020 12:02 PM2020-09-08T12:02:37+5:302020-09-08T12:02:59+5:30
पुरवठा विभागाला पर्यायाने शासनाला लक्षावधी रुपयांचा फटका बसत असल्याचे दिसून येते.
- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : राज्यात अतिशय मागास जिल्हा म्हणून ओळख असलेल्या बुलडाणा जिल्ह्यात अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य गट लाभार्थी कुटूंबासाठी या दोन योजनेतंर्गत वितरीत केल्या जाणाऱ्या बारदान्यापोटी महिन्याला तब्बल ८४ लक्ष रुपयांचा खर्च केला जात आहे. उल्लेखनिय म्हणजे, उपरोक्त दोन्ही योजनेसाठी उपयोगात येणाºया बारदाºयाचा पुनर्वापर आणि उपयोग होत नसल्याने पुरवठा विभागाला पर्यायाने शासनाला लक्षावधी रुपयांचा फटका बसत असल्याचे दिसून येते.
विविध योजनेच्या लाभार्थ्यांना जिल्ह्यातील १३ तालुक्यातील बुलडाणा, चिखली, अमडापूर, दे. राजा, मेहकर, डोणगाव, लोणार, सिंदखेड राजा, साखरखेर्डा, मलकापूर, मोताळा, नांदुरा, खामगाव, शेगाव, जळगाव जामोद आणि संग्रामपूर या १६ बेस गोदामातून धान्य पाठविण्यात येते.
बेस गोदामातून आलेल्या धान्याचे उप त्या-त्या भागातील गोदामात प्रमाणीकरण करण्यात येते. यामध्ये ५० किलो धान्याचे वजन: ५८०(कट्ट्याचे वजन ५८० ग्रॅम):५० यातून कट्ट्याचे वजन कमी करण्यात येते. त्यानंतर जिल्ह्यातील सुमारे १५०० स्वस्त: धान्य दुकानदारांना बारदाना हाताळणीसाठी दिला जातो. स्वस्त धान्य दुकानदारांना प्रति क्विंटल प्रमाणे दिलेले २ कट्ट्यांचा कोणताही पुनर्वापर केला जात नाही. तसेच हा बारदाना परत घेतल्या जात नाही. त्यामुळे जिल्ह्याला लागणाºया लक्षावधी रूपयांच्या बारदानाच्या कोणताही हिशोब नंतर जुळून येत नसल्याचे दिसून येते.
अंत्योदय योजनेसाठी लागतात २ लक्ष ३६ हजार कट्टे!
अंत्योदय अन्न योजनेतंर्गत जिल्ह्याचे १ लक्ष १८००० क्विंटल धान्याचे मासिक नियतन आहे. हे धान्य वितरीत करण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाला एका क्ंिवटलला दोन प्रमाणे २ लक्ष ३६ हजार कट्टे लागतात. तर प्राधान्य गट लाभार्थी कुटुंबासाठी मासिक धान्याचे नियतन ९२००० हजार क्विंटल धान्याचे आहे. प्राधान्य गटातील धान्य वितरणासाठी १ लक्ष ८४ हजार कट्टे लागतात.
कट्ट्यांसाठी ८४ लाखांचा खर्च!
४योजना निहाय धान्य वितरणासाठी २ लक्ष ३६००० (अंत्योदय-१ लक्ष १८००० क्ंिवटल) ४७ हजार २०००० रुपयांचे तर १ लक्ष ८४००० कट्टे (प्राधान गट लाभार्थी योजना-९२ हजार क्विंटल धान्य) किंमत ३६ लक्ष ८०००० रुपये असा एकुण ८४ लक्ष रुपयांचा बारदाना लागतो. या बारदान्याचा पुनर्वापर आणि कोणताही उपयोग होत नाही. त्यामुळे शासनाला महिन्यांकाठी लक्षावधी रूपयांचा फटका बसत आहे.
असे आहे धान्य निहाय नियतन!
४जिल्ह्यात अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य गट लाभार्थी कुटुंब योजनेंतर्गत ४३ हजार ७९० क्ंिवटल तांदूळ वितरीत केला जातो. ५३ हजार७१० क्विंटल गहू तर शेतकरी योजनेतंर्गत १९ हजार १०० लाभार्थ्यांना धान्याचे वितरण केले जाते.