वृक्षलागवड योजनेंतर्गतची ८६ टक्के झाडे जगली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:39 AM2021-08-12T04:39:07+5:302021-08-12T04:39:07+5:30

बुलडाणा: शतकोटी वृक्ष लागवड योजनेतंर्गत बुलडाणा जिल्ह्यात गेल्या चार वर्षात लावण्यात आलेल्या वृक्षांपैकी तब्बल ८६ टक्के झाडे जगली असल्याचा ...

86% of the trees survived under the tree planting scheme | वृक्षलागवड योजनेंतर्गतची ८६ टक्के झाडे जगली

वृक्षलागवड योजनेंतर्गतची ८६ टक्के झाडे जगली

Next

बुलडाणा: शतकोटी वृक्ष लागवड योजनेतंर्गत बुलडाणा जिल्ह्यात गेल्या चार वर्षात लावण्यात आलेल्या वृक्षांपैकी तब्बल ८६ टक्के झाडे जगली असल्याचा दावा सामाजिक वनिकरण विभागाने केला आहे. दरम्यान चालू वर्षी आतापर्यंत ११ लाख २३ हजार वृक्षांची लागवड करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

गेल्या आठवड्यात सिंदखेड राजा पंचायत समितीमध्ये झालेल्या आढावा बैठकीत सिंदखेड राजा तालुक्यात २ लाखांपेक्षा अधिक झाडे लावल्याचा दावा अधिकाऱ्याने करत बहुतांश झाडे जगल्याचे सांगितले होते. त्यावर प्रत्यक्ष झाडांची पाहणी आपण व्यक्तीश: करणार आहोत. यादी तयार ठेवा असे सुचक वक्तव्य अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले होते. त्या आधारावर गेल्या चार वर्षात जिल्ह्यात झालेल्या वृक्ष लागवडीचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला असता विभागीय वन अधिकारी बी. एन. पायघन यानी ही माहिती दिली. २०१७ पासून ही वृक्ष लागवड योजना सुरू झाली असून यामध्ये २०१७ ते २०२० या कालावधीत २३ लाख ४ हजार ६६८ झाडे लावण्यात आली असून त्यापैकी १९ लाख ७५ हजार ३९६ झाडे जगल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

--या जागांवर लावली झाडे--

मनरेगा, नाविन्यपूर्ण योजनेसह अन्य काही योजनांतून रस्त्यांच्या दुतर्फा, ईक्लास जमिनीवर व शहरी तथा ग्रामीण भागातील मोकळ्या जागांमध्ये वृक्ष लावण्यात आले असल्याची माहिती विभागीय वन अधिकारी यांनी दिली. दरम्यान या कामासाठी गेल्या चार वर्षात जवळपास ४० कोटी रुपयाच्या आसपास खर्च झाला असल्याचेही त्यांनी ‘लोकमत’शी बोलतांना स्पष्ट केले.

--या वृक्षांना दिले प्राधान्य--

प्रामुख्याने सागवान, बोर, सीताफळ, शिवण, कॅशिया, सिसू, गुलमोहर, पापडा, करंज, बांबू, लिंब, वड, पिंपळ ही झाडे लावण्यास प्राधान्य देण्यात आले असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. दरम्यान पारंपारिक भारतीय झाडांना प्राधान्य देण्याच्या धोरणाबाबत विचारणा केली असता भारतीय झाडांना आपण प्राधान्य देत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

--यंदा ८ लाख १७ हजार झाडे लावली--

२०२१ मध्ये आतापर्यंत ८ लाख १७ हजार झाडांचा विनियोग झाला असल्याचे विभागीय वन अधिकारी बी. एन. पायघन म्हणाले. दरम्यान ११ लाख २३ हजार छोटी रोपे व ३ लाख ९८ हजार मोठी रोपे (उंच रोपे) अशी एकूण १५ लाख २१ हजार रोपे उपलब्ध होती. त्यापैकी ३ लाख राेपे विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

--वर्षनिहाय लावलेली झाडे--

प्रकार लावलेली झाडे जगलेली झाडे जगलेल्या झाडांची टक्केवारी

चार कोटी वृक्ष लागवड १,४४,९०० १०,०१९४ ६९.१५

१३ कोटी वृक्ष लागवड १,९९,०२२ १,३६,४४८ ६८.५६

३३ कोटी वृक्ष लागवड १८,५२,५४६ १६,३४,६१३ ८८.२४

२०२० मधील वृक्ष लागवड १,०८,२०० १,०४,१४१ ९६.२४

Web Title: 86% of the trees survived under the tree planting scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.