अस्थमा असलेल्या ८९ वर्षीय वृद्धाची काेराेनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:56 AM2021-05-05T04:56:44+5:302021-05-05T04:56:44+5:30
किनगाव जट्टू : अस्थमाचा आजार असल्यानंतरही बरे हाेण्याचा आत्मविश्वास आणि लस घेतल्यामुळे वाढलेली राेगप्रतिकारशक्तीच्या बळावर किनगाव जट्टू येथील ...
किनगाव जट्टू : अस्थमाचा आजार असल्यानंतरही बरे हाेण्याचा आत्मविश्वास आणि लस घेतल्यामुळे वाढलेली राेगप्रतिकारशक्तीच्या बळावर किनगाव जट्टू येथील ८९ वर्षीय वृद्धाने काेराेनावर मात केली आहे़ उपचारानंतर २ मे राेजी ते सुखरूप घरी परतले आहेत.
जिल्ह्यात गत काही दिवसांपासून काेराेना संसर्ग माेठ्या प्रमाणात वाढत आहे. काेराेनामुळे वृद्धांचा मृत्यू हाेण्याचे प्रमाण वाढले आहे. ग्रामीण भागातही मृत्यू वाढत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र, आत्मविश्वास आणि लस घेतल्याने वाढलेल्या राेगप्रतिकारशक्तीच्या बळावर किनगाव जट्टू येथील अंबादास अश्रूजी जाधव यांनी काेराेनावर मात केली आहे. अंबादास अश्रूजी जाधव यांना काेराेनाची लागण झाली हाेती. २६ एप्रिल रोजी त्यांची बीबी ग्रामीण रुग्णालयात प्रकृती खालावल्याने बुलडाणा येथील कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले हाेते. त्यांच्यावर बुलडाणा येथे उपचार करण्यात आला. योग्य वेळी उपचार व आरोग्य कर्मचाऱ्यांनी घेतलेली काळजी त्यामुळे आपली प्रकृती ठणठणीत झाल्याने ३ मे रोजी सुटी मिळाली, असे अंबादास जाधव यांनी सांगितले. स्वतःवर दृढ विश्वास व २९ मार्च रोजी किनगाव जट्टू येथे शिबिरामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणात लस घेणारा मी प्रथम नागरिक हाेताे. त्यामुळेच मी काेराेनावर मात करू शकलाे, असेही जाधव यांनी सांगितले़ ग्रामस्थांनी काेराेनाची भीती न बाळगता काळजी घ्यावी, लसीमुळे राेगप्रतिकारशक्ती वाढत असल्याने लस घ्यावी, असे आवाहन जाधव यांनी लाेकमतशी बाेलताना केले़