जिल्ह्यात ८९१ पॉझिटिव्ह, दोन मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:35 AM2021-04-07T04:35:48+5:302021-04-07T04:35:48+5:30
निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून ८५८, तर रॅपिड टेस्टमधील ४२६७ अहवालांचा समावेश आहे. बुलडाणा शहर व तालुका ३६७, खामगांव ४६, ...
निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून ८५८, तर रॅपिड टेस्टमधील ४२६७ अहवालांचा समावेश आहे. बुलडाणा शहर व तालुका ३६७, खामगांव ४६, शेगांव तालुक्यात ५९, देऊळगाव राजा तालुका व शहर ३७, चिखली शहर व तालुका ९५, मेहकर शहर व तालुका ५०, मलकापूर शहर व तालुका ४४, नांदुरा शहर व तालुका ३८, लोणार शहर व तालुका ४४, मोताळा शहर व तालुका २४, जळगांव जामोद ३२, सिंदखेड राजा ४३, संग्रामपूर १२ संशयीत व्यक्ती पॉझिटिव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात ८९१ रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान आनंद सोसायटी, मलकापूर येथील ७७ वर्षीय पुरुष, व इतापे ले आऊट, बुलडाणा येथील ७३ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
७८५ जणांनी कोरोनावर मात
जिल्ह्यात ७८५ रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आजपर्यंत २४४५७७ रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत ३६४५३ कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या ३६४५३ आहे. आज रोजी ३१७८ नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहे. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल २४४५७७ आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण ४२५९५ कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी ३६४५३ कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात ५८५३ कोरोनाबाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत २८९ कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे.