९५ वर्षीय आजीबाईचे उत्स्फूर्त मतदान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 18:52 IST2019-04-18T18:51:44+5:302019-04-18T18:52:09+5:30
खामगाव: लोकशाहीच्या महोत्सवात गुरूवारी एका ९५ वर्षीय आजीबाईने उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावला.

९५ वर्षीय आजीबाईचे उत्स्फूर्त मतदान!
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: लोकशाहीच्या महोत्सवात गुरूवारी एका ९५ वर्षीय आजीबाईने उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावला. स्वत: मतदान केले; इतरांनी माझ्यापासून प्रेरणाघेत मतदान करावे, असे आवाहनही या आजीबाईने मतदारांना केले.
स्थानिक सती फैल भागातील जानकीबाई गोकुळ श्रीवास्तव (९५) रा. सतीफैल, रेखाप्लॉट या दुपारी आपल्या नातवांसोबत मतदान केंद्रावर दाखल झाल्या. व्हीलचेअरवरून मतदान कक्षात पोहोचल्या. छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद शाळा क्रमांक २. मध्ये मतदान केल्यानंतर त्यांनी इतरांनी मतदान करण्याचे आवाहन केले.