९६५ भाविक पंढरपूरला रवाना

By admin | Published: July 3, 2017 12:44 AM2017-07-03T00:44:27+5:302017-07-03T01:11:21+5:30

विठ्ठल दर्शन एक्स्प्रेसची चौथी फेरी : भाविकांची अलोट गर्दी

9 65 devotees leave for Pandharpur | ९६५ भाविक पंढरपूरला रवाना

९६५ भाविक पंढरपूरला रवाना

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : आषाढी एकादशी यात्रा महोत्सवात सहभागी होण्यासाठी २ जुलै रोजी येथून निघालेल्या चौथ्या विठ्ठल दर्शन एक्स्प्रेसने ९६५ भाविक पंढरपूरला मार्गस्थ झाले.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनाची आस भाविकांना लागलेली असते. या भाविकांसाठी यावर्षी येथून २८ जून रोजी दुपारी ४ वाजता १२ बोगींची पहिली फेरी रवाना झाली. त्यानंतर २९ जून रोजी दुसरी, १ जुलै रोजी तिसरी फेरी रवाना झाली, तर चौथी आणि शेवटची फेरी रविवार, २ जुलै रोजी सायंकाळी ७.३० वाजता पंढरपूरसाठी रवाना झाली. रविवारी ६५५ तिकिटांची विक्री झाली असून, ९६५ भाविक पंढरपूरसाठी रवाना झाले.
भाविकांना तिकीट घेताना गैरसोय होऊ नये, यासाठी अतिरिक्त खिडकीसुद्धा सकाळपासून सुरु करण्यात आली होती.
तसेच विविध सामाजिक संघटनांसोबतच भाविकांना सुविधा पुरविण्यासाठी येथील रेल्वे स्टेशन प्रबंधक संजय भगत, मुख्य बुकिंग पर्यवेक्षक यांच्यासोबतच उपस्टेशन प्रबंधक सुरेश गोळे, कुणालकुमार, मुख्य तिकीट पर्यवेक्षक आर.एस.गोळे, प्रशांत बनसोड, सोनाजी तेलगोटे, नीरज मिलिंद, टी.आय. देशपांडे, सी.आय. निकम, इंद्रपाल म्हैसकर, व्ही.आर.वानखडे, इंदिराबाई ठाकूर, संजीवनी इंगळे, उमाबाई व इतरांनी परिश्रम घेतले.
ही एक्स्प्रेस जलंब येथे पोहोचल्यानंतर अमरावती येथून निघालेल्या विठ्ठल दर्शन एक्स्प्रेसच्या बोग्या या एक्स्प्रेसला जोडण्यात आल्या.

विविध संघटनांकडून वारकऱ्यांचे स्वागत
विठ्ठल दर्शन एक्स्प्रेसने पंढरपूरसाठी रवाना होणाऱ्या भाविकांचे विविध राजकीय पक्षासोबतच सामाजिक संघटनांच्यावतीने स्वागत करण्यात आले. यावेळी गुरूद्वारा सिंग सभेच्यावतीने सर्वच वारकऱ्यांना मोफत पाण्याच्या बाटल्या वितरित करण्यात आल्या. भाजप, शिवसेना, काँग्रेस, हरिओम गु्रपच्यावतीनेही फराळ आणि चहा देण्यात आला.

Web Title: 9 65 devotees leave for Pandharpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.