कोरोनामुळे ९ जणांचा मृत्यू, ६६२ जण पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:26 AM2021-04-29T04:26:55+5:302021-04-29T04:26:55+5:30
पॉझिटिव्ह आलेल्या अहवालामध्ये बुलडाणा तालुक्यात १०३, खामगाव ५२, शेगाव २६, देऊळगाव राजा २८, चिखली ८१, मेहकर १०, मलकापूर ६२, ...
पॉझिटिव्ह आलेल्या अहवालामध्ये बुलडाणा तालुक्यात १०३, खामगाव ५२, शेगाव २६, देऊळगाव राजा २८, चिखली ८१, मेहकर १०, मलकापूर ६२, नांदुरा १०२, लोणार ३०, मोताळा ५३, जळगाव जामोद ५०, सि. राजा ४३, संग्रामपूर तालुक्यातील २२ जणांचा समावेश आहे. उपचारादरम्यान बुधवारी जिल्ह्यात ९ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये बुलडाणा येथील शिवाजीनगरमधील ३८ वर्षीय व्यक्ती आणि बुलडाणा शहरातीलच ५० वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. सोबतच देऊळघाट येथील ५५ वर्षीय व्यक्ती, जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे येथील ५० वर्षीय व्यक्ती, नांदुरा तालुक्यातील खातखेड येथील ४८ वर्षीय व्यक्ती, चिखलीमधील राजा टॉवर परिसरातील ८३ वर्षीय व्यक्ती, बुलडाणा तालुक्यातील गुम्मी येथील ५० वर्षीय व्यक्ती आणि जालना जिल्ह्यातील टेंभुर्णी येथील ८६ वर्षीय व्यक्तीचा यामध्ये समावेश आहे.
दुसरीकडे बुधवारी ६४१ जणांनी कोरोनावर मात केली. तर आतापर्यंत तपासण्यात आलेल्या अहवालांपैकी ३ लाख ४७ हजार ९८६ संदिग्धांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यासोबतच ५४ हजार ३११ जणांनी कोरोनावर आतापर्यंत मात केली आहे.
--७३४१ सक्रिय रुग्ण--
जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या सध्या ६२ हजार ५१ झाली असून यापैकी ७ हजार ३४१ सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. बुधवारी ४ हजार २९८ संदिग्धांचे अहवाल तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. आतापर्यंत ३९९ बाधितांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.