जिल्ह्यात ९ हजार ६६४ उमेदवार रिंगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:51 AM2021-01-08T05:51:22+5:302021-01-08T05:51:22+5:30
बुलडाणा : जिल्ह्यात ५२७ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी राेजी मतदान हाेणार आहे. ४ जानेवारी अर्ज मागे घेण्याची मुदत हाेती. ...
बुलडाणा : जिल्ह्यात ५२७ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी राेजी मतदान हाेणार आहे. ४ जानेवारी अर्ज मागे घेण्याची मुदत हाेती. जिल्ह्यातील ३ हजार ७ उमेदवारांनी ३ हजार १०४ उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. या माघारीनंतर जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून, ग्रामपंचायतींसाठी ९ हजार ६६४ उमेदवार निवडणुकींच्या रिंगणात आहेत. निवडणुकीला फाटा देत २७ ग्रामपंचायतींमधील ९५ सदस्य अविरोध निवडून आले आहेत.
जिल्ह्यात अर्ज स्वीकारण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत ५२७ ग्रामपंचायतींसाठी १३ हजार ३२० उमेदवारांकडून १३ हजार ६०९ अर्ज दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर ३१ डिसेंबर रोजी झालेल्या छाननीमध्ये १७९ उमेदवारांचे २१० अर्ज नामंजूर करण्यात आले. छाननीअंति बाद झालेल्या अर्जानंतर १३ हजार १४१ उमेदवारांचे १३ हजार ३९९ अर्ज शिल्लक आहेत. सध्या माघारीनंतर ९ हजार ६६४ उमेदवार निवडणूक आखाड्यात आहेत. सर्वांत जास्त १ हजार ३८७ उमेदवार खामगाव तालुक्यात असून, अर्ज १४०५ आहेत. बुलडाणा तालुक्यात १ हजार १७१ उमेदवार, चिखलीमध्ये १ हजार ११०, दे.राजा तालुक्यात २६२, सिं. राजामध्ये ६१०, मेहकरमध्ये ७९५, लोणार तालुक्यात ३०१, शेगाव तालुक्यात ६३५, जळगाव जामोदमध्ये ४५६, संग्रामपूर तालुक्यात ५७४, मलकापूरमध्ये ५८१, नांदुरा तालुक्यात ७७६ व मोताळा तालुक्यात १००६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.