रेतीचे अवैध उत्खनन करून वाहतुक करणारे ९ टिप्पर पकडले: १३ जणांना अटक
By संदीप वानखेडे | Published: December 31, 2023 07:45 PM2023-12-31T19:45:07+5:302023-12-31T19:45:18+5:30
चिंचखेड परिसरात महसुल आणि पोलिस प्रशासनाची संयुक्त कारवाई
अंढेरा : देऊळगाव राजा तालुक्यात सगळीकडेच अवैध रेती माफियांचा सुळसुळाट सुरू आहे. चिंचखेड परिसरात बुलढाण्याचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव व अंढेरा पाेलिसांनी संयुक्त कारवाई करीत ९ टिप्पर पकडले. पथकाने १३ जणांना अटक केली असून लाखाे रुपयांचा एवज जप्त केला आहे. या कारवाईमुळे रेती माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.
चिंचखेड परिसरात रेतीचे अवैध उत्खनन करून वाहतूक हाेत असल्याची माहिती महसूलच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे बुलढाण्याचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, अंढेराचे ठाणेदार विकास पाटील, चिखलीचे तहसीलदार सुरेश कव्हळे, देऊळगाव राजाचे तहसीलदार सचिन जयस्वाल यांच्या संयुक्त पथकाने ३० डिसेंबर रेाजी रात्री सुलतानपूर चिंचखेड परिसरात धाड टाकली. यावेळी पथकाला पाहताच ९ टिप्पर चालकांनी रेती उसाच्या शेतात रिकामी करून पळ काढला. पथकाने गामस्थांच्या मदतीने ९ ही टिप्पर जप्त केले आहे. यातील चार टिप्पर अंढेरा पोलिस स्टेशनला लावले असून जागेअभावी पाच टिप्पर देऊळगाव राजा पोलिस स्टेशनला लावण्यात आले आहे. याप्रकरणी फिर्यादी परमेश्वर बुरकुल तलाठी चिंचखेड यांच्या फिर्यादीवरून अवैधरीत्या रेती वाहतूक करणारे टिप्पर यांचे चालक व मालक यांच्याविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हाे दाखल केला आहे. याप्रकरणी १३ जणांना अटक करण्यात आली आहे.
पथकात याचाही सहभाग
कारवाई करणाऱ्या पथकात मंडळ अधिकारी विजय हिरवे मेव्हणा राजा, परमेश्वर बुरकुल चिचखेड तलाठी, संजय हांडे मंडपगाव तलाठी, विलास नागरे मेव्हणा राजा तलाठी, विनोद डोईफोडे अंढेरा तलाठी, सुभाष वाकोडे पिंपळगाव बु. तलाठी, मधुकर आबाजी उदार सिनगाव जहाँगीर तलाठी, तसेच वाहन चालक नरेंद्र उबाळे व गजानन ताकतोडे यांचा समावेश हाेता.
यांच्याविरुद्ध झाला गुन्हा दाखल
अंढेरा पाेलिसांनी अजय गजानन देशमाने, रा. चिखली, रामेश्वर साेळंकी, रा. चांधई, विजय संजय शिंगणे, रा. दे. मही, कैलास सखाराम पायघन, रा. गाेदरी, विशाल कैलास गरड, रा. खैरव, अक्षय अनिल देशमुख, रा. साखरखेर्डा, संदीप पंढरीनाथ चेके, रा. सुरा, गणेश बाबूराव साळवे, रा. दे. मही, मुकुंदा काशीनाथ वाडेकर, रा. सा. भाेई, ज्ञानेश्वर ऊर्फ परमेश्वर संताेष माने, रा. सा. भाेई, शेख युसूफ शेख गुलाब, रा. दुसरबीड, दीपक ज्ञानदेव माेगल, रा. चांगेफळ, सुनील सूर्यभान मकासर, रा. बायगाव यांच्यावर गुन्हा दाखल केला.