९ वर्षांची चिमुकली बचावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:39 AM2021-08-21T04:39:31+5:302021-08-21T04:39:31+5:30

राहेरी बुद्रुक : सिंदखेड राजा तालुक्यातील तढेगाव फाट्यावर १३ जणांचा जीव घेणाऱ्या यमाच्या तावडीडून ९ वर्षांची चिमुकली बचावली आहे. ...

9 year old Chimukali rescued | ९ वर्षांची चिमुकली बचावली

९ वर्षांची चिमुकली बचावली

Next

राहेरी बुद्रुक : सिंदखेड राजा तालुक्यातील तढेगाव फाट्यावर १३ जणांचा जीव घेणाऱ्या यमाच्या तावडीडून ९ वर्षांची चिमुकली बचावली आहे. काळाने तिच्यावरही झडप घालण्याचा प्रयत्न केला; पण तिची वेळ आली नव्हती, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. मात्र, प्रत्यक्ष संपूर्ण घटनाक्रम बघणारी ही चिमुकली अत्यंत भेदरलेली आहे. त्यामुळे काय बोलावे हेही तिला सुचत नव्हते.

छबू गावड, असे या चिमुकलीचे नाव आहे. समृद्धी महामार्गाच्या साखळी क्रमांक ३१९ वरून परत येत असताना ही चिमुकली टिप्पर चालकाच्या सोबत केबिनमध्ये बसलेली होती. समोरून येणाऱ्या वाहनाला साइड देण्यासाठी टिप्पर चालक त्याचे वाहन बाजूला घेत असतानाच अपघाताची जाणीव होताच त्याने छबूला धक्का देत केबिनमधून बाहेर लोटल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. पावसामुळे रस्त्यालगत मोठ्या प्रमाणावर तरोटा आणि गाजर गवत उगवलेले आहे. त्यावर अलगद ही चिमकुली फेकली गेली व दैव बलवत्तर म्हणून ती बचावली.

चालकही बचावला

या घटना क्रमादरम्यान चालकही थोडक्यात बचावला आहे. छबूला केबिनमधून बाहेर ढकलत तोही बाहेर पडला. दरम्यान, घटनेचे गांभीर्य पाहता त्यानेही अपघातातील जखमींसोबत जालना गाठले. सध्या जालना येथे तो या अपघातात मृत पावलेल्या १३ जणांच्या नातेवाईक व सहकाऱ्यांसह उपस्थित असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

------

समृद्धी महामार्गावर काम करणाऱ्या गरीब मजुरांवर काळाने घाला घातला आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. अशा घटना घडून कोणाचाच बळी जाऊ नये. संपूर्ण घटनेची माहिती आपण घेतली असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. मृत मजुरांच्या कुटुंबीयांवर झालेला आघात मोठा आहे. मृतांच्या आत्म्याला शांती मिळावी आणि हे भीषण दुःख सहन करण्याची शक्ती ईश्वराने मजुरांच्या कुटुंबीयांना द्यावी हीच प्रार्थना. मृत मजुरांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीसंदर्भात आपण स्वतः राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बोलणार आहोत.

(डॉ. राजेंद्र शिंगणे, पालकमंत्री, बुलडाणा)

Web Title: 9 year old Chimukali rescued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.