९० जण पाॅझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:36 AM2021-05-07T04:36:51+5:302021-05-07T04:36:51+5:30
राेहणा येथील एकाचा मृत्यू बुलडाणा : काेराेना संसर्ग ग्रामीण भागातही माेठ्या प्रमाणात वाढत आहे. काेराेनामुळे मृत्यू हाेणाऱ्यांची संख्या वाढत ...
राेहणा येथील एकाचा मृत्यू
बुलडाणा : काेराेना संसर्ग ग्रामीण भागातही माेठ्या प्रमाणात वाढत आहे. काेराेनामुळे मृत्यू हाेणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. राेहणा ता. खामगाव येथील ७९ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
दोन महिलांवर केले अंत्यसंस्कार
नांदुरा : कोरोना आजार झाल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या दोन महिलांवर महसूल प्रशासन व ओमसाई फाउंडेशनने पुढाकार घेत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. कोविड सेंटरमध्ये शहरासह तालुक्यातील कोविड बाधित रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत.
पालेभाज्यांची स्वस्त दराने विक्री
सुटाळा : सध्या हर्राशी बंद असल्याने शेतकऱ्यांना त्यांचा भाजीपाला स्वत: घरपोच विकावा लागत आहे. यामुळे पालेभाज्यांचे दर उतरल्याचे दिसून येत आहे. पालक, चवळीसह इतर रानभाज्या स्वस्त दराने विक्री होत आहेत. यामुळे ग्राहकांना दिलासा मिळत असल्याचे दिसून येत आहे. आणखी काही दिवस हीच परिस्थिती राहण्याचे संकेत आहेत.
शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीची कास धरावी!
खेर्डा : शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीची कास धरावी, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे. जिल्ह्यात सेंद्रिय शेतकरी गटाची स्थापना करण्यात आली असून शेतकऱ्यांनी सहभाग वाढवावा, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.