९०१ जणांची काेराेनावर मात; ११३ पाॅझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:25 AM2021-06-01T04:25:58+5:302021-06-01T04:25:58+5:30
बुलडाणा : जिल्ह्यात काेराेनाची दुसरी लाट ओसरत असून, साेमवारी केवळ ११३ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. तसेच ९०१ ...
बुलडाणा : जिल्ह्यात काेराेनाची दुसरी लाट ओसरत असून, साेमवारी केवळ ११३ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. तसेच ९०१ जणांनी काेराेनावर मात केली असून, २२८१ काेराेना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पाच जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. काेराेना रुग्णांची संख्या घटली असली तरी मृत्यूची संख्या कायम असल्याचे चित्र आहे.
पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये बुलडाणा शहर १३, बुलडाणा तालुका ०४, मोताळा तालुका ०३, खामगाव शहर ०५, खामगाव तालुका १८, शेगाव शहर ०५, शेगाव तालुका ०१, चिखली शहर ०४, चिखली तालुका १२, मलकापूर शहर ०१ , मलकापूर तालुका ०२, दे. राजा शहर ०२, दे. राजा तालुका ०२, संग्रामपूर तालुका ०७, सिं. राजा शहर ०१, सिं. राजा तालुका ०७, मेहकर शहर ०५, मेहकर तालुका ०३, जळगाव जामोद तालुका ०३, नांदुरा शहर ०१, नांदुरा तालुका ०४, लोणार शहर ०२, लोणार तालुका ०२, परजिल्ह्यातील चार जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान इसोली, ता. चिखली येथील ७५ वर्षीय महिला, चिखली येथील ५५ वर्षीय महिला, सुटाळा, ता. खामगाव येथील २८ वर्षीय पुरुष, जिगाव, ता. नांदुरा येथील ७५ वर्षीय महिला, मेहकर येथील ७५ वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आजपर्यंत चार लाख ८० हजार ९९६ अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. आज रोजी ३६४ नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत.
६०६ जणांचा मृत्यू
जिल्ह्यात आजअखेर एकूण ८४ हजार ७७८ कोरोनाबाधित रुग्ण असून, त्यापैकी ८२ हजार ३४३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रुग्णालयात १८२९ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत ६०६ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.