लॉकडाऊनच्या काळात बंद झालेल्या बुलडाणा जिल्ह्यातील ९१० बसफेऱ्या बंदच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 11:50 AM2021-02-10T11:50:35+5:302021-02-10T11:53:17+5:30
Buldhana News लॉकडाऊनच्या काळात बंद झालेल्या ९१० बसफेऱ्या अद्यापही बंदच आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: लॉकडाऊनच्या काळामध्ये बंद करण्यात आलेल्या बसफेऱ्या टप्याटप्याने सुरू करण्यात आल्या आहेत. सध्या सर्वाधिक प्रवासी मार्गावरील बसेस सुरू करण्यात आलेल्या आहेत. आता पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्यानंतरही ग्रामीण भागातील काही बसेस सुरू करण्यात आल्या नाहीत. लॉकडाऊनच्या काळात बंद झालेल्या ९१० बसफेऱ्या अद्यापही बंदच आहेत.
जिल्ह्यातील एसटी महामंडळाच्या सात आगारामधून लॉकडाऊनपूर्वी दिवसाला ३ हजार १९२ बसफेऱ्या सुरू होत्या. त्यानंतर लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर टप्याटप्याने बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. आता शाळा, महाविद्यालये सुरू झाले असून, प्रवासी संख्याही वाढली आहे. वाढती प्रवासी संख्या पाहता एसटी महामंडळाने बसेस वाढविण्यावर भर दिला आहे.
३ हजार १९२ बसफेऱ्यांपैकी सद्यस्थितीत २ हजार २८२ बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. लॉकडाऊनच्या काळात बंद झालेल्या ९१० बसफेऱ्या बंदच असल्याचे दिसून येते. काही भागामध्ये विद्यार्थ्यांचा प्रतिसाद पाहता, केवळ विद्यार्थ्यांसाठी बसफेऱ्या सुरू करण्यात येत आहेत. त्यामुळे एसटीच्या उत्पन्नातही वाढ होत आहे.
सध्या ग्रामीण भागातील अनेक बसफेऱ्या सुरू करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. लॉकडाऊनपूर्वी असलेल्या बसेस सुरू करणे आवश्यक आहे. आता प्रवाशी संख्या वाढलेली आहे. बसस्थानकावरही गर्दी दिसून येते. बसेस वाढविणे फायद्याचेच आहे.
-अमोल गरड,
प्रवासी.
पाचवी ते आठवीच्या शाळाही आता सुरू झाल्या आहेत. परंतू ग्रामीण भागातील बसेस बंदच आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शहराच्या ठिकाणी शाळेत जाण्यासाठी अडचणी येत आहेत. विद्यार्थ्यांसाठी बसेस सुरू करण्याची गरज आहे. अनेक विद्यार्थ्यांनी ऑटोकरून शाळेत जावे लागत आहे. मानव विकासच्या बसेसही बंद आहेत.
-रुपेश जगताप,
प्रवासी.