लॉकडाऊनच्या काळात बंद झालेल्या ९१० बसफेऱ्या बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:35 AM2021-02-10T04:35:28+5:302021-02-10T04:35:28+5:30
१.५० कोटींनी उत्पन्न घटले बसफेऱ्या कमी केल्याने एसटी महामंडळाचे लॉकडाऊनच्या काळामध्ये दीड कोटींनी उत्पन्न घटले आहे. मालवाहतूकीने एसटी महामंडळाला ...
१.५० कोटींनी उत्पन्न घटले
बसफेऱ्या कमी केल्याने एसटी महामंडळाचे लॉकडाऊनच्या काळामध्ये दीड कोटींनी उत्पन्न घटले आहे. मालवाहतूकीने एसटी महामंडळाला चांगला आर्थिक लाभ झाला. आता हळूहळू एसटी महामंडळाचे अर्थचक्र रुळावर येत आहे.
दररोज होणाऱ्या बसफेऱ्या
लॉकडाऊनपूर्वी सद्यस्थितीत
बुलडाणा ४६८ ३१४
चिखली ४०४ २२८
खामगाव ४६२ २९८
मेहकर ५३२ ३३६
मलकापूर ४८२ ३७०
जळगाव जामोद ५०० ४६०
शेगाव ३४४ २७६
सर्वाधिक प्रवासी मार्ग
बुलडाणा जिल्ह्यातून नागपूर, अमरावती, अकोला, औरंगाबाद, पुणे हे सर्वाधिक प्रवासी मार्ग आहेत. बुलडाणा आगरामधून चिखली, मेहकर, खामगाव, मलकापूर या मार्गावरील बसफेऱ्यांना सर्वाधिक प्रवासी मिळतात. सध्या सर्वाधिक प्रवासी मार्गावरील सर्व बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत.
सध्या ग्रामीण भागातील अनेक बसफेऱ्या सुरू करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. लॉकडाऊनपूर्वी असलेल्या बसेस सुरू करणे आवश्यक आहे. आता प्रवाशी संख्या वाढलेली आहे.
अमोल गरड, प्रवासी.
पाचवी ते आठवीच्या शाळाही आता सुरू झाल्या आहेत. परंतू ग्रामीण भागातील बसेस बंदच आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत शहराच्या ठिकाणी जाण्यासाठी अडचणी येत आहेत. विद्यार्थ्यांसाठी बसेस सुरू करण्याची गरज आहे.
रुपेश जगताप, प्रवासी.