जिल्ह्यात ९२९ पॉझिटिव्ह, दोन मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:36 AM2021-04-04T04:36:07+5:302021-04-04T04:36:07+5:30
प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील ७१४ व रॅपीड टेस्टमधील २१५ अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून १०९७, तर रॅपिड टेस्टमधील ...
प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील ७१४ व रॅपीड टेस्टमधील २१५ अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून १०९७, तर रॅपिड टेस्टमधील ३०५२ अहवालांचा समावेश आहे. पॉझिटिव्ह अहवालामध्ये बुलडाणा शहर १२८, बुलडाणा तालुक्यातील चौथा, केसापूर, गुम्मी, पांगरी, करडी येथे रुग्ण आढळून आले आहेत. सुंदरखेड येथे पाच, नांद्राकोळी तीन, तांदुळवाडी पाच, येळगांव, बिरसिंगपूर, वरवंड येथे दोन, धाड, देऊळघाट येथे तीन रुग्ण सापडले. मोताळा शहरात पाच, मोताळा तालुक्यातील महालपिंप्री, खेडा, सिंदखेड, माळेगांव, जयपूर, डिडोळा, सांगळद, शेलगांव बाजार, पिं. देवी, उबाळखेड, तपोवन, वाघजाळ, शेलापूर, बोराखेडी, लोणघाट, लिहा, देवपूर येथे रुग्ण सापडले असून, एकट्या आव्हा गावात १३ बाधित आहेत. खामगांव शहरात ५६, खामगांव तालुक्यात राहुड, पिं. राजा, शेलोडी, सुटाळा, गणेशपूर, नागापूर, टेंभुर्णा, आडगांव, सज्जनपूरी, जनुना, बोथा फॉरेस्ट, कारेगांव, लाखनवाडा, वझर येथे रुग्ण सापडले. शेगांव शहरात ६२, शेगांव तालुक्यात येऊलखेड, कालखेड, टाकळी, कदमपूर, जवळा, चिंचोली, गौलखेड, तरोडा कसबा, सागड, जानोरी, जलंब, लासुरा, पहुरपुर्णा, पलसोडा गावात रुग्ण सापडले. चिखली शहरात ४५, मलकापूर शहरात १०२, देऊळगाव राजा शहरात ४६, सिंदखेड राजा शहरात १९, मेहकर शहरात १७, संग्रामपूर तालुक्यातील चौंढी, रूधाना, सोनाळा येथ प्रत्येक रुग्ण आढळून आला आहे. जळगांव जामोद शहरात १५, नांदुरा शहरात ५१, लोणार शहरात आठ व इतर काही रुग्ण तालुक्यात पॉझिटिव्ह आले आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात ९२९ रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान मेहकर येथील ६५ वर्षीय महिला व चिखली तालुक्यातील पेठ येथील ५० वर्षीय महिला रूग्णाचा मृत्यू झाला आहे.