मोताळा तालुक्यात ९४७ उमेदवार रिंगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:26 AM2021-01-10T04:26:21+5:302021-01-10T04:26:21+5:30
मोताळा : तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतीमधील ४७८ सदस्य पदाच्या जागांसाठी निवडणूक होऊ घातली आहे. यातील दोन ग्रामपंचायतीसह ८३ सदस्यांची अविरोध ...
मोताळा : तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतीमधील ४७८ सदस्य पदाच्या जागांसाठी निवडणूक होऊ घातली आहे. यातील दोन ग्रामपंचायतीसह ८३ सदस्यांची अविरोध निवड होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तालुक्यात ३८९ जागांसाठी तब्बल ९४७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया आटोपल्यावर लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी २५४ उमेदवारांनी माघार घेतली. तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींमधील ८३ उमेदवारांची अविरोध निवड होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यात कोल्ही गवळी-७, टाकळी घडेकर-६, दाभाडी-७, सिंदखेड-४, कोथळी-४, इब्राहिमपूर-४, रिधोरा खंडोपंत-४, टाकळी वाघजाळ-४, शिरवा-३, पान्हेरा-३, लिहा बु.-३, सारोळापीर-२, तरोडा-२, खामखेड-२, मोहेंगाव-२, धामणगाव देशमुख-२, पिंपळगाव नाथ-२, किन्होळा-२, ब्राह्मंदा-२, कोल्हीगोलर-२, बोराखेडी-२, खरबडी-२, रोहिणखेड-१, जहांगीरपूर-१, अंत्री-१, कुऱ्हा-१, उऱ्हा-३, शेलापूर खुर्द-४, टेंभी-१ अशा ८३ उमेदवारांचा समावेश आहे. तालुक्यातील कोल्ही गवळी व टाकळी घडेकर या दोन ग्रामपंचायती अविरोध निवड होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तालुक्यातील स्मार्ट ग्राम दाभाडी ग्रा.पं.मधील ९ पैकी ७ सदस्यांची अविरोध निवड निश्चित असून, येथे केवळ दोन जागांसाठी मतदान होणार आहे. गावागावात प्रचाराचा धुराळा जोमात असून, निवडणूक चुरशीची होणार आहे. निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी तहसीलदार एस.एम.चव्हाण, नायब तहसीलदार आशिष सानप, सतीश मुळे, सतीश घड्याळे, प्रशांत जवरे व कर्मचारी परिश्रम घेत आहेत.
पाच जागा रिक्त राहणार
तालुक्यातील काबरखेड, कोल्ही गोलर, टाकळी घडेकर, मोहेगाव या चार ग्रामपंचायतींमधील अनुसूचित जमाती प्रवर्गातील प्रत्येकी एक जागा आणि माकोडी येथील अनुसूचित जाती प्रवर्गातील एक अशा पाच जागांसाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे या पाच जागा रिक्त राहणार असल्याची माहिती मिळाली आहे.