९५ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:33 AM2021-03-19T04:33:34+5:302021-03-19T04:33:34+5:30

प्रभारी लाईनमनमुळे नागरिकांना त्रास बुलडाणा : तालुक्यातील बहुतांश गावात लाईनमनकडे अनेक गावांचा पदभार आहे. सध्या ग्रामीण भागात वीज जाण्याचे ...

95 positive | ९५ पॉझिटिव्ह

९५ पॉझिटिव्ह

Next

प्रभारी लाईनमनमुळे नागरिकांना त्रास

बुलडाणा : तालुक्यातील बहुतांश गावात लाईनमनकडे अनेक गावांचा पदभार आहे. सध्या ग्रामीण भागात वीज जाण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे वीज सुरळीत करण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्रत्येक गावासाठी लाईनमन द्यावा, अशी मागणी केली जात आहे.

स्वयंरोजगारासाठी निधी उपलब्ध करावा

बुलडाणा : शासनातील विविध विभागांमध्ये नोकरभरतीवर बंदी घातली आहे. त्यातच लॉकडाऊनमुळे अनेकजण बेरोजगार झाले आहेत. अनेक युवक स्वयंरोजगारासाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र कर्ज मिळत नसल्याने व्यवसाय कसा उभारावा असा प्रश्न आहे. बेराेजगारांना राेजगारासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी हाेत आहे.

रेडियम अभावी अपघाताची शक्यता

बुलडाणा : जिल्ह्यातील अनेक वळण रस्त्यावर रेडियम नसल्याने रात्रीच्या वेळी वाहनांचे अपघात होण्याची शक्‍यता आहे. वाहनचालकांना रात्रीच्या वेळी समोरील रस्ता दिसत नाही. त्यामुळे अपघाताची शक्‍यता आहे. शहर परिसरात वाढत्या अपघाताच्या घटना चिंतेचा विषय ठरत आहेत.

फळबागावर अळींचा प्रादुर्भाव ; शेतकरी त्रस्त

बुलडाणा : अतिवृष्टीमुळे यंदा खरिपातील पिके शेतकऱ्यांच्या हातातून गेली आहेत. त्यात आता फळबागा आणि रब्बीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर शेतकऱ्यांचे आर्थिक प्रश्न मार्गी लागणार आहेत ; मात्र तालुक्यात पेरू, मोसंबीसह इतर फळबागांवर सध्या अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकरी महागडी औषधे फवारणी करीत आहेत. याकडे लक्ष देऊन कृषी विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे.

कीटकनाशकांचा सतत वापर धोक्याचा

बुलडाणा : भाजीपाला पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करताना शिफारशी मात्रेतच फवारणी करणे आवश्यक आहे. अन्यथा फुलगळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकाच कीटकनाशकांचा वापर सतत करणे धोक्याचे आहे. कीटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांनी केले आहे.

बसफेऱ्या सुरू करण्याची प्रतीक्षा

बुलडाणा : ग्रामीण भागातील बसफेऱ्या पूर्ववत सुरू करण्यास राज्य परिवहन विभागाला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. त्यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रवाशांसह विद्यार्थ्यांचीही मोठी गैरसोय होत आहे. बुलडाणा आगाराने शहरी भागात धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या बसफेऱ्या सुरू केल्या आहेत.

घरकुलाचे हप्ते थकले

बुलडाणा : बांधकाम पूर्ण झालेल्या घरकुलांचे थकलेले हप्ते लाभार्थींच्या खात्यावर भरण्यात आलेले नाहीत. वारंवार मागणी करून देखील आश्वासनाशिवाय दुसरे काहीही लाभार्थींना मिळत नाही. हा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा आंदाेलन करण्याचा इशारा लाभार्थींनी दिला.

जॉबकार्डची प्रतीक्षा

बुलडाणा : बुलडाण्यासह मोताळा तालुक्यात अनेक बेरोजगार आहेत. तालुक्यात रोजगार उपलब्ध नसल्याने मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा परिस्थितीमध्ये अनेकांना जॉबकार्डची प्रतीक्षा आहे.

सायकल विक्रीत झाली वाढ

बुलडाणा : पेट्रोल व डिझेलच्या किमतीत वाढ झाल्याने अनेक नागरिक व युवक मोठ्या प्रमाणात सायकलिंगला पसंती देत आहेत. शारीरिक तंदुरुस्तीला नागरिकांनी प्राधान्य देणे सुरू केल्याने सायकलची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विविध प्रकारच्या सायकली विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

Web Title: 95 positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.