श्रीराम मंदिरासाठी बालाजी अर्बनकडून ९७ हजारांचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 05:04 AM2021-02-06T05:04:36+5:302021-02-06T05:04:36+5:30
चिखली : अयोध्या येथील श्रीराम मंदिर निर्माणासाठी शहरातील अग्रगण्य पतसंस्था बालाजी अर्बन परिवाराने सक्रिय सहभाग नोंदवत ९७ हजार ६०० ...
चिखली : अयोध्या येथील श्रीराम मंदिर निर्माणासाठी शहरातील अग्रगण्य पतसंस्था बालाजी अर्बन परिवाराने सक्रिय सहभाग नोंदवत ९७ हजार ६०० रुपयांचे दान दिले आहे.
बालाजी अर्बनच्या मुख्यालयात एका छोटेखानी कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष अॅड. मंगेश व्यवहारे यांनी या निधीचा धनादेश आमदार श्वेता महाले यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी नगर संघचालक शरद भाला यांची प्रमुख उपस्थिती होती, तसेच संस्थेचे संचालक सुदर्शन भालेराव, नारायण भवर, सरव्यवस्थापक अनिल गाडे आदी उपस्थित होते. यावेळी आ.महाले यांनी संस्थेचे कार्य व राबवित असलेल्या सामाजिक उपक्रमांबाबत समाधान व्यक्त केले. संस्थेचे अध्यक्ष अॅड. मंगेश व्यवहारे यांनी राममंदिर निधी संकलनात प्रत्येक हिंदूने समर्पण द्यावे, असे आवाहन केले. या निधीत अॅड. मंगेश व्यवहारे यांनी व्यक्तिश: २१ हजार, उपाध्यक्ष सत्यनारायण लढ्ढा यांनी ७ हजार ५००, धनराज सिमेंट प्राॅक्डट्स प्रोप्रा शार्दुल व्यवहारे व शिरीष सावजी यांनी १० हजार, संस्थेचे माजी संचालक प्राचार्य मधुकर खरात व संचालक प्रताप खरात यांनी ६ हजार, नारायण भवर यांनी २१०० तर कर्मचाऱ्यांनी ५१ हजार असे एकूण ९७ हजार ६०० रुपयांची देणगी दिली आहे. (तालुका प्रतिनिधी)
कॅप्शन : आ.महाले यांना धनादेश देताना अॅड.व्यवहार, भाला आदी.