बुलडाण्यात ९८ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:33 AM2021-04-11T04:33:59+5:302021-04-11T04:33:59+5:30
मजुर, कामगारांवर उपासमारीची पाळी देऊळगाव मही : लॉकडाऊन काळात कामधंदे बंद असल्याने मजूर, कामगारांवर उपासमारीची पाळी आली आहे. घरखर्च ...
मजुर, कामगारांवर उपासमारीची पाळी
देऊळगाव मही : लॉकडाऊन काळात कामधंदे बंद असल्याने मजूर, कामगारांवर उपासमारीची पाळी आली आहे. घरखर्च कसा भागवावा, असा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित झाला आहे. त्यांना मदतीची गरज आहे.
लग्न समारंभाशी निगडित व्यवसायांवर गदा!
किनगावराजा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे धार्मिक व सामाजिक सोहळ्यांवर बंदी आहे. लग्न समारंभांनाही याचा फटका बसला असून निगडित व्यवसायांवर गदा आली आहे. मंडप डेकोरेशन, मंगल कार्यालय, फोटोग्राफी, केटरिंग, फूल व्यवसाय, वाजंत्र्यांची ऐन सीझनमध्ये कमाई थांबल्याने मोठा आर्थिक फटका बसला आहे.
‘लॉकडाऊन’मध्ये रस्त्यांवर गर्दी
सुलतानपूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कडक निर्बंध करण्यात आले आहेत. मात्र तरीदेखील परिसरातील रस्त्यांवर नागरिक गर्दी करत असल्याचे दिसून येत आहे. अत्यावश्यक कामांशिवाय नागरिकांनी बाहेर न पडता घरातच थांबण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने वारंवार करण्यात येत आहे. या आवाहनाकडे नागरिकांकडून दुर्लक्ष केल्या जात असल्याचे दिसून येत आहे.
‘डोअर टू डोअर’ सर्व्हेची गरज
साखरखेर्डा : ‘कोरोना’चे रुग्ण आता ग्रामीण भागातही वाढत आहेत. विषाणूला रोखण्यासाठी आरोग्य विभागाने चांगलीच दखल घेतली आहे. त्या पार्श्वभूमीवर साखरखेर्डा येथील आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांनी ‘डोअर टू डोअर’ जाऊन आरोग्याविषयी जनजागृती मोहीम राबविणे आवश्यक आहे.
निमगाव गुरू येथे जंतुनाशक फवारणी
निमगाव गुरू : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता स्थानिक ग्रामपंचायतकडून गावात जंतुनाशक औषधांची फवारणी ९ एप्रिल रोजी करण्यात आली. यावेळी भिकाजी निलक, राजेंद्र दौलत चित्ते, रामदास गुरव, परमेश्वर भालेराव, आकाश चित्ते, ज्ञानदेव माऊदे व ग्रामस्थ उपस्थित होते. कोरोनाचे रुग्ण आता गावागावात सापडत आहेत. त्यामुळे प्रत्येकाने मास्क लावणे, गर्दी टाळणे आदी प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
उन्हाचा पारा उतरला
धाड : एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाची तीव्रता वाढली आहे. परंतु १० एप्रिल रोजी उन्हाचा पारा कमी झाल्याचे दिसून आले. सध्या जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे शनिवारी बहुतांश भागात ढगाळ वातावरण होते.
पाणवठ्याला निधीचा खोडा
सिंदखेडराजा : गेल्या वर्षी शासनाकडून पाणवठ्यासाठी अनुदान मिळाले नाही. यावर्षीही लॉकडाऊनमुळे सर्व ठप्प पडले आहे. निधीच नाही मग वनविभाग पाणवठ्यांची सोय कुठून करणार. नागरिकांनीच आता पाणवठ्यात पाणी टाकावे, असे आवाहन करण्यात येत आहे. कोरोनामुळे पाणवठ्याला निधीचा खोडा निर्माण झाला आहे.
सिमेंट नाला बंधाऱ्यांची कामे अपूर्ण
बीबी : परिसरातील सिमेंट नाला बंधाऱ्यांची कामे अपूर्ण आहेत. जिल्ह्यात पडणाऱ्या कमी पावसामुळे सिंचनाचा प्रश्न गंभीर आहे. प्रत्येक गावात नदी, नाल्यावर सिमेंट नाला बांध बांधले. परंतु काही ठिकाणी हे काम अपूर्ण स्थितीत अडकले आहे.
वातावरणात बदल; शेतकरी चिंताग्रस्त
मेहकर : तालुक्यात दोन दिवसांपासून हवामानात बदल झाला आहे. ढगाळ वातावरणही निर्माण झाल्याने पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या गहू काढणी अंतिम टप्प्यात आहे. परंतु वातावरणातील बदलामुळे गहू उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त दिसून येत आहेत.
बसथांब्यावर धुळीमुळे प्रवासी त्रस्त
जानेफळ : येथील बसथांब्यावर धुळीमुळे प्रवासी व व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. धुळीमुळे श्वसनाच्या आजाराची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बस, मोठी वाहने गेल्यानंतर बसस्थानक परिसरात जोराची धूळ उडते. आजूबाजूच्या व्यावसायिकांना याचा त्रास सहन करावा लागतो.