बुलढाण्यात अस्वलाच्या हल्ल्यातून दुचाकीस्वार थोडक्यात बचावला

By निलेश जोशी | Published: June 13, 2023 05:34 PM2023-06-13T17:34:31+5:302023-06-13T17:36:31+5:30

बुलढाणा शहरापासून सुमारे १५ किमी अंतरावर असलेल्या डोंगरखंडाळा येथे १२ जून रोजी पहाटे साडेसहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

A biker narrowly escaped being attacked by a bear in Buldhana | बुलढाण्यात अस्वलाच्या हल्ल्यातून दुचाकीस्वार थोडक्यात बचावला

बुलढाण्यात अस्वलाच्या हल्ल्यातून दुचाकीस्वार थोडक्यात बचावला

googlenewsNext

बुलढाणा: तालुक्यातील डोंगर खंडाळा येथे शाळेतील हापशीवर पाणी आणण्यासाठी दुचाकीवर जाणाऱ्या एका युवकावर अस्वलाने अचानक हल्ला केल्याची घटना १२ जून रोजी पहाटे घडली. दरम्यान स्थानिकांनी आरडाअेारड केल्याने अस्वलाने शेताकडे मोर्चा वळविल्याने दुचाकीस्वार थोडक्यात बचावला. घटनाक्रम इतक्या वेगात घडला की दुचाकीस्वार खाली पडला व त्याच्या दुचाकीवरच अस्वल धडकले. बुलढाणा शहरापासून सुमारे १५ किमी अंतरावर असलेल्या डोंगरखंडाळा येथे १२ जून रोजी पहाटे साडेसहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

डोंगरखंडाळा येथे श्री संभाजी राजे विद्यालय आहे. येथील हापसीवर ग्रामस्थ सकाळीच पिण्याचे पाणी आणण्यासाठी जातात. त्याच पद्धतीने शिवा सावळे हा युवक सकाळी दुचाकीवर शाळेकडे पाणी आणण्यासाठी जात होता. दरम्यान वरवंड शिवाराकडून अचानक अस्वल आले आणि नाल्यातून वर चढताच शिवाची व अस्वलाची क्षणार्धात नजरानजर झाली आणि अस्वलाने शिवाकडे मोर्चा वळवला. तोवर आजूबाजूच्या लोकांनी आरडाअेारड करत शिवालाही सतर्क केले होते. मात्र अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे शिवा गडबला होता. त्यामुळे दुचाकीवरून तो खाली पडला व सुरक्षीत स्थळी धावयला लागला. तेवढ्यात अस्वलाने त्याचा पाठलाग केला. मात्र अस्वल दुचाकीला धडकले व नंतर विरुद्ध दिशेने शेतात अस्वलाने पलायन केले. परंतू या घटनाक्रमात शिवा थोडक्यात बचावला.

नागरिकांमध्ये घबराट

डोंगरखंडाळा हे गाव ज्ञानगंगा अभयारण्याच्या लगतच्या पट्ट्यात आहे. या भागात नेहमीच अस्वलाचे दर्शन होते. मात्र आता चक्क अस्वलाने गावालगतच मोर्चा वळवल्याचे यातून दिसून येते. त्यामुळे डोंगरखंडाळा गाव परिसरात नागरिकांमध्ये घबराट आहे. ज्ञानगंगा अभयारण्य हे तसे अस्वलांसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे या भागात नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वनविभागाने जाणिव जागृती करण्याची गरज आहे.

मानव-वन्यजीव संघर्ष जूनाच

बुलढाणा जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष हा जुनाच असून २०१० च्या दशकापर्यंत दरवर्षी जिल्ह्यात हिंस्त्र श्वापदांच्या हल्ल्यात तीन जण ठार होण्याचा जुना इतिहास आहे. आता परिस्थिती काहीशी बदलली असली तरी हा विषय अधिक गंभीरतेने घेणे गरजेचे आहे.

१२ जून रोजी पहाटे पाणी आणण्यासाठी दुचाकीवर जात होतो. तेव्हा ग्रामस्थांनी जागीच थांबण्याचे सुचवले. पण नेमके काय झाले ते समजले नाही. तेव्हा अचानक समोर अस्वल आले. त्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. दुचाकी खाली पडल्याने त्याला ते धडकले व विरुद्ध दिशेने गेले.
शिवा सावळे, डाेंगरखंडाळा

Web Title: A biker narrowly escaped being attacked by a bear in Buldhana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.