इन्स्टाग्रामवर मैत्री करणे भाेवले, युवकावर गुन्हा दाखल
By संदीप वानखेडे | Published: August 29, 2023 05:40 PM2023-08-29T17:40:07+5:302023-08-29T17:44:59+5:30
युवतीच्या भावाने सायबर पाेलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यावरून सायबर पाेलिसांनी याप्रकरणी आराेपी दिपेश वाधवानी याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला
बुलढाणा : समाज माध्यमावर बहरलेले प्रेम प्रकरण एका युवकाच्या चांगलेच अंगलट आले, युवतीच्या घरच्यांनी ताकीद दिल्यानंतर बिथरलेल्या प्रेमविराने युवतीची समाज माध्यमावर बदनामी करण्याची धमकी दिली. त्यावरून सायबर पाेलिसांनी आराेपी युवकाविरुद्ध २९ ऑगस्ट राेजी गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
जळगाव खान्देश येथील दिपेश लक्ष्मण वाधवानी याचे खामगावातील एका युवतीबराेबर फेसबुकवर ओळख झाली. दराेज चॅटिंग सुरू झाल्याने त्यांच्यात मैत्री वाढली मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले, त्यानंतर युवक आणि युवती इन्स्टाग्रामवर अश्लील चॅटिंग करू लागले, दाेघे खामगावात भेटूही लागले, या प्रकाराची कुणकुण युवतीच्या भावाला लागताच त्याने युवकाला पुन्हा मॅसेज न करण्याची धमकी प्रेमवीराला दिली मात्र, त्यानंतर बिथरलेल्या दिपेश वाधवानी याने युवतीच्या भावाला युवतीचे आक्षेपार्ह फाेटाे पाठवले, तसेच लग्न न करून दिल्यास समाज माध्यमात बदनामी करण्याची धमकी दिली.
युवतीच्या भावाने सायबर पाेलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यावरून सायबर पाेलिसांनी याप्रकरणी आराेपी दिपेश वाधवानी याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. तसेच त्याला नंदुरबार येथून अटक केली. ही कारवाई पाेलिस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनात सायबरचे पाेलिस निरीक्षक सारंग नवलकार, सहायक पाेलिस निरीक्षक सुनील साेळुंके, पाेलिस अंमलदार ज्ञानेश नागरे, राजू आडवे, दीपक जाधव, विकी खरात, शाेएब अहेमद यांनी केली.