अंगावर भिंत पडून बांधकाम मिस्त्रीचा मृत्यू, बुलढाणा तालुक्यातील भादोला येथील घटना

By भगवान वानखेडे | Published: October 14, 2022 05:32 PM2022-10-14T17:32:06+5:302022-10-14T17:32:20+5:30

Accident: घराचे बांधकाम करीत असताना दोन दिवसापूर्वीच बांधण्यात आलेली भिंत बांधकाम मिस्त्रीच्याच अंगावर पडून त्यांचा मृत्यू झाला. ही घटना १४ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहा वाजता दरम्यान तालुक्यातील भादोला येथे घडली.  

A construction mason died after a wall fell on him, an incident at Bhadola in Buldhana taluka | अंगावर भिंत पडून बांधकाम मिस्त्रीचा मृत्यू, बुलढाणा तालुक्यातील भादोला येथील घटना

अंगावर भिंत पडून बांधकाम मिस्त्रीचा मृत्यू, बुलढाणा तालुक्यातील भादोला येथील घटना

googlenewsNext

- भगवान वानखेडे
बुलढाणा -  घराचे बांधकाम करीत असताना दोन दिवसापूर्वीच बांधण्यात आलेली भिंत बांधकाम मिस्त्रीच्याच अंगावर पडून त्यांचा मृत्यू झाला. ही घटना १४ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहा वाजता दरम्यान तालुक्यातील भादोला येथे घडली.
  ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गंत येणाऱ्या भादोला येथे रामभाऊ व्यव्हारे यांच्या घराचे बांधकाम सुरु आहे. हे बांधकाम अण्णासाहेब जगदेव मिसाळ (३५,भादोला) आणि त्यांचे सहाकरी मजुर करीत होते. शुक्रवारी सकाळी बांधकाम सुरु करण्यात आल्यानंतर दोन दिवसापूर्वीच बांधलेली भिंत अण्णासाहेब मिसाळ यांच्या अंगावर पडली. त्यांना तातडीने येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र,डॉक्टरांना तपासून त्यांना मृत घोषीत केले. याप्रकरणी ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: A construction mason died after a wall fell on him, an incident at Bhadola in Buldhana taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात