काळजी घ्या! चिखलीत आढळला कोरोनाचा एक रूग्ण; नवीन उपप्रकार जेएन १ ची लागण

By निलेश जोशी | Published: January 1, 2024 06:01 PM2024-01-01T18:01:12+5:302024-01-01T18:01:26+5:30

राज्यात काही दिवसांपासून कोविडचा संसर्ग होण्यास सुरुवात झाली आहे.

A Corona patient was found in the mud Infection with the new subtype JN1 | काळजी घ्या! चिखलीत आढळला कोरोनाचा एक रूग्ण; नवीन उपप्रकार जेएन १ ची लागण

काळजी घ्या! चिखलीत आढळला कोरोनाचा एक रूग्ण; नवीन उपप्रकार जेएन १ ची लागण

चिखली (बुलढाणा) : कोरोना विषाणूचा नवीन जेएन-१ या उपप्रकाराचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात झाली असून, याची लागण झालेला पहिला रुग्ण चिखलीत आढळला आहे. यामुळे धास्ती वाढली आहे. मात्र लक्षणे सौम्य आहेत, त्यामुळे नागरिकांनी काळजी करू नये, खबरदारी घ्यावी, असा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे.

राज्यात काही दिवसांपासून कोविडचा संसर्ग होण्यास सुरुवात झाली आहे. नव्या वर्षात याचा फैलाव होताना दिसून येत आहे. शहरातील ४८ वर्षीय एका आरोग्य कर्मचाऱ्याला कोरोनाची काही लक्षणे जाणवल्याने त्यांनी ‘रॅपिड टेस्ट’ केली असता त्यांचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आला आहे. सदर आरोग्य कर्मचारी आठवड्यातील तीन दिवस बुलढाणा तर तीन दिवस चिखली येथे सेवा देतात. अंगदुखी, ताप, खोकला अशी सौम्य लक्षणे आढळून आल्याने त्यांनी तपासणी करून घेतली. त्यात संसर्ग झाल्याचे आढळून आले. सध्या त्यांच्यावर गृहविलगीकरणात उपचार सुरू आहेत.

संपर्कातील १२ जण निगेटिव्ह
आरोग्य विभागाने खबरदारी म्हणून कोरोनाचा संसर्ग झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संपर्कातील १२ जणांचीही तपासणी केली आहे. मात्र, त्या सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने दिलासा मिळाला आहे.

गर्दीत जाणे टाळा, मास्क वापरा...
सध्याची कोविडची लक्षणे अत्यंत सौम्य आहेत. त्यामुळे जास्त घाबरून जाऊ नये, मात्र, खबरदारी घ्यावी, गर्दीत जाणे टाळावे, मास्क वापरावा, सोशल डिस्टन्स ठेवावा. शंका आल्यास तपासणी करून घ्यावी. - डॉ. अमोल राजपूत, आरोग्य अधिकारी चिखली उपजिल्हा रुग्णालय.
 

Web Title: A Corona patient was found in the mud Infection with the new subtype JN1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.