राजुर घाटात कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला

By भगवान वानखेडे | Published: August 31, 2022 04:29 PM2022-08-31T16:29:56+5:302022-08-31T16:30:56+5:30

शहरापासून चार ते पाच किलो मीटर अंतरावर असलेल्या राजुर घाटातील देवीच्या मंदिरा मागील जंगलात अंदाजे ३५ ते ४० वय असलेल्या पुरुष जातीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.

A decomposed dead body was found in Rajur Ghat buldhana | राजुर घाटात कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला

राजुर घाटात कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला

Next

बुलढाणा : 

शहरापासून चार ते पाच किलो मीटर अंतरावर असलेल्या राजुर घाटातील देवीच्या मंदिरा मागील जंगलात अंदाजे ३५ ते ४० वय असलेल्या पुरुष जातीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. ही घटना ३१ ऑगस्ट रोजी उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. बुलढाणा ते मोताळा रोडवरील राजुर घाटात असलेल्या देवीच्या मंदिरा मागील जंगलात अंदाजे ३५ ते ४० वय असलेल्या पुरुष जातीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह मेंढपाळाना २९ ऑगस्ट रोजी सायंकाळी आढळून आला होता. याप्रकरणी मेंढपाळांनी बोराखेडी पोलिसांना माहिती दिली. 

बोराखेडी पोलिसांनी तेव्हाच घटनास्थळ गाठून मृतदेह शोधण्याचा आणि इतर उत्तरीय प्रक्रिया करण्याचा प्रयत्न केला. मात्र, रात्रीच्या अंधारामुळे अडथळे येत असल्याने मृतदेह असलेले घटनास्थळ शोधण्याचे कार्य थांबले. ३० ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजेपासून बोराखेडी पोलिसांसह बुलढाणा शहर पोलिसांनी मृतदेह असलेले घटनास्थळ शोधून काढले.

उपविभागीय पोलीस अधिकारी घटनास्थळी
राजुर घाटातील जंगलात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम, शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद काटकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बळीराम गिते,बोराखेडीचे ठाणेदार आणि इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

घटनास्थळीच होणार शवविच्छेदन
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेह असलेल्या घटनास्थळीच डॉक्टरांकडून मृतदेहाची तपासणी करुन शव विच्छेदन करण्यात आले. आता या शवविच्छेदन अहवालावरुन पोलिसांच्या तपासाची दिशा ठरणार आहे.

Web Title: A decomposed dead body was found in Rajur Ghat buldhana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.