बद्रीनाथ येथील अलकनंदा नदीत बुलढाण्यातील भाविक बुडाला; बचाव पथकाद्वारे शोध सुरू 

By निलेश जोशी | Published: October 12, 2023 08:22 PM2023-10-12T20:22:04+5:302023-10-12T20:22:17+5:30

तिर्थयात्रेसाठी गेलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील काही भाविकांपैकी एकाचा पाय घसरून ते अलकनंदा नदीत पडल्याची घटना १२ ऑक्टोबर रोजी समोर आली आहे.

A devotee from Buldhana drowned in the Alaknanda river at Badrinath Search by rescue team started | बद्रीनाथ येथील अलकनंदा नदीत बुलढाण्यातील भाविक बुडाला; बचाव पथकाद्वारे शोध सुरू 

बद्रीनाथ येथील अलकनंदा नदीत बुलढाण्यातील भाविक बुडाला; बचाव पथकाद्वारे शोध सुरू 

बुलढाणा : तिर्थयात्रेसाठी गेलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील काही भाविकांपैकी एकाचा पाय घसरून ते अलकनंदा नदीत पडल्याची घटना १२ ऑक्टोबर रोजी समोर आली आहे. दरम्यान उत्तराखंडमधील राज्य आपत्ती निवारण विभागाचे पथक त्यांचा शोध घेत आहे. ८ ऑक्टोबर पासून बुलढाण्यातील भाविकांचा एक गट तिर्थयात्रेवर गेलेला आहे. या गटासोबतच बुलढाण्यातील दिलीप रघाणी हे सपत्नीक गेले आहे. दरम्यान १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास बद्रीनाथ मंदिरात दर्शन घेतल्यानंतर पींडदान विधी पारपडाल. त्यानंतर बुलढाणा शहरातील कारंजा चौकानजीक रहाणाले दिली रघाणी हे अलकनंदा नदीच्या किनाऱ्यावर आले. तेथे अचानक त्यांचा पाय घसरून ते नदीत पडले. त्यांचा शोध युद्ध स्तरावर सुरू असून हेलिकॉप्टरचीही मदत घेतली जात असल्याची माहिती आहे.

हेलिकॉप्टरची सुद्धा मदत घेतली जात आहे. दरम्यान ही घटना १२ ऑक्टोबर रोजी सकाळी घडल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. बुलढाणा व चिखली येथून जवळपास २४ भाविक यात्रेसाठी गेले असल्याची माहिती जय अंबे ट्रॅव्हल्सचे सचीन चौहाण यांनी दिली. दरम्यान यासंदर्भात बुलढाणा तहसीलदार रुपेश खंडारे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की उत्तराखंड सरकारकडून अद्याप यासंदर्भात अधिकृत माहिती आम्हास मिळाली नसल्याचे सांगण्यात आले.

नदीचे पाणी आणण्यासाठी होते गेले 
बद्रीनाथ येथे दर्शन व सर्व कार्यक्रम आटोपल्यानंतर दिलीप रघाणी व अन्य एक जण हे नदीवर पाणी आणण्यासाठी गेले होते. अलकनंदा अर्थात गंगा नदीच्या पाण्याला पवित्र मानल्या जाते. त्या भावनेने ते गेले होते. दरम्यानच्या काळात ही घटना घडली. दरम्यान या घटनेमुळे त्यांच्या समवेत असलेल्या एका भाविकालाही शॉक बसला आहे. या यात्रेत दिलीप रघाणी यांची पत्नी सुष्माही सोबत असल्याची माहिती त्यांचे नातेवाईक व जय अंबे ट्रॅव्हलर्सचे सचीन चव्हाण यांनी दिली.

उद्या पुन्हा बचाव पथक घेणार शोध
सायंकाळ पर्यंत दिलीप रघाणी यांचा शोध लागला नव्हता. दरम्यान ज्या ठिकाणी घटना घडली तेथून जवळच नऊ किमी अंतरावर एक धरण आहे. आता बचाव पथक १३ ऑक्टोबर रोजी त्या भागात त्यांचा शोध घेणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.
 

Web Title: A devotee from Buldhana drowned in the Alaknanda river at Badrinath Search by rescue team started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.