रानात राबणाऱ्या शेतकरी दांपत्यावर वीज कोसळली; पत्नी जागीच ठार, पती गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2022 10:15 AM2022-08-05T10:15:32+5:302022-08-05T10:16:01+5:30

साठेगाव येथील गजानन संपत नागरे, वय 55 व त्यांच्या पत्नी रुख्मिणाबाई गजानन नागरे हे दोघे पतीपत्नी शेतात निंदनाचे काम करीत

A farmer couple working in the forest was struck by lightning, the wife was killed on the spot and the husband was seriously injured in buldhana | रानात राबणाऱ्या शेतकरी दांपत्यावर वीज कोसळली; पत्नी जागीच ठार, पती गंभीर

रानात राबणाऱ्या शेतकरी दांपत्यावर वीज कोसळली; पत्नी जागीच ठार, पती गंभीर

Next

बुलडाणा - जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यात गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसासह विजांचा कडकडाट पाहायला मिळाला. या पावासाच्या तडाख्यात आणि वीजांच्या लपंडावात साठेगाव येथील रुख्मिणाबाई गजानन नागरे, (वय 50 वर्षे) ह्यांचा वीज कोसळून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे. 

साठेगाव येथील गजानन संपत नागरे, वय 55 व त्यांच्या पत्नी रुख्मिणाबाई गजानन नागरे हे दोघे पतीपत्नी शेतात निंदनाचे काम करीत असतांना  आलेल्या पावसातून स्वतःला वाचवण्यासाठी दोघांनी शेतातील बोरीच्या झाडाचा आसरा घेतला. त्याचवेळी त्या झाडावर वीज कोसळली. ह्या दुर्घटनेत रुख्मिणाबाई ह्या जागीच ठार झाल्या तर गजानन नागरे हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना पुढील उपचारासाठी जालना येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. 

दरम्यान, सदर घटनेची माहिती मिळताच किनगावराजाचा पोलीस चमू घटनास्थळी दाखल झाला. मृत रुख्मिनाबाई यांच्या मृतदेहाचा पंचनामा करीत शवविच्छेदन करण्यासाठी सिंदखेडराजा येथे रवाना करण्यात आला आहे.
 

Web Title: A farmer couple working in the forest was struck by lightning, the wife was killed on the spot and the husband was seriously injured in buldhana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.