ज्ञानगंगा अभायरण्यात मेंढ्या चराई करणाऱ्यास दहा हजारांचा दंड

By अनिल गवई | Published: August 22, 2023 02:01 PM2023-08-22T14:01:40+5:302023-08-22T14:02:30+5:30

खामगाव वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांची कारवाई

A fine of 10,000 is imposed on those who graze sheep in the Dyan Ganga sanctuary | ज्ञानगंगा अभायरण्यात मेंढ्या चराई करणाऱ्यास दहा हजारांचा दंड

ज्ञानगंगा अभायरण्यात मेंढ्या चराई करणाऱ्यास दहा हजारांचा दंड

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव: ज्ञानगंगा अभयारण्यातील खामगाव वन्यजीव परीक्षेत्रामधील गेरू बिटमध्ये अवैध रित्या मेंढ्या चराई करणार्यास दहा हजाराचा दंड ठोठावण्यात आला. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली. या कारवाईमुळे अवैध शेळी मेंढ्या चराई करणार्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर असे की, ज्ञानगंगा अभयारण्यातील गेरू िबट कक्ष क्रमांक २२५ मध्ये सामुहिक गस्तीदरम्यान नांदी येथील पांडू वामन हटकर हा अवैध मेढ्या चराई करताना आढळून आला. त्याच्या िवरोधात भारतीय वनअधिनियम १९७२ चे कलम २७, २९ नुसार वन गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच आरोपीला दहा हजारांचा दंडही ठोठावण्यात आला. ही कारवाई विभागीय वनअधिकारी अ. वा. निमजे, सहा. वनसंरक्षक सी. एम. राठोड, वनपरिक्षेत्र अधिकारी डी. सी. लोखंडे यांच्या मार्गदर्शनात वनपाल एस. आर. भिसे, वनरक्षक एम. के. ताठे यांनी ही कारवाई केली.

Web Title: A fine of 10,000 is imposed on those who graze sheep in the Dyan Ganga sanctuary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.