फेक फेसबूक अकाऊंटमुळे वकीलाची एक लाख रुपयांची फसवणूक

By अनिल गवई | Published: October 3, 2023 07:40 PM2023-10-03T19:40:23+5:302023-10-03T19:40:54+5:30

याबाबत अॅड. बडगुजर यांच्या तक्रारीवरुन सायबर पोलिसांनी अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

A lawyer was cheated of Rs 1 lakh due to a fake Facebook account | फेक फेसबूक अकाऊंटमुळे वकीलाची एक लाख रुपयांची फसवणूक

फेक फेसबूक अकाऊंटमुळे वकीलाची एक लाख रुपयांची फसवणूक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: फेक फेसबुक अकाऊंटवरुन आलेल्या मॅसेजला प्रतिसाद दिल्याने येथील वकील संघाचे अध्यक्ष अॅड. संजय बडगुजर यांची तब्बल १ लाखाने फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत अॅड. बडगुजर यांच्या तक्रारीवरुन सायबर पोलिसांनी अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

अॅड. बडगुजर यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद आहे की, त्यांना ३ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी त्यांच्या मेहकर येथील सरकारी अधिकारी असलेल्या मित्राच्या फेसबुक मॅसेंजरवरून एक मॅसेज आला. एका सीआरपीएफ अधिकार्याचे घरातील काही सामान विकणे आहे. आवडल्यास घेवू शकता असा मजकुर त्या मॅसेजमध्ये होता. तसेच संबंधीत सिआरपीएफ अधिकाऱ्याचा मोबाईल नंबर देखील त्यात दिलेला होता. त्या नंबरवर अँड. बडगुजर यांनी संपर्क साधला असता त्या व्यक्तीने सामानाचे काही फोटो पाठविले. संबंधित सामान विकायचे असल्याचे सांगितले. त्यावेळी अॅड. बडगुजर यांनी प्रतिसाद देत त्या व्यक्तीने सांगितल्या प्रमाणे त्यांच्या गुगलपेवरून ९३५१९८३४७६ या क्रमांकावर तीन टप्प्यात १ लाख रुपये सेंड केले. त्यानंतर अॅड. बडगुजर यांनी त्यांच्या मेहकर येथील मित्राला फोन करुन ही बाब सांगितली. दरम्यान, या सर्व प्रकाराचा उलगडा झाला. त्यांच्या मित्राच्या नावाने कुणीतरी फेक फेसबुक' अकाऊंट तयार करुन अॅड. बडगुजर यांची फसवणुक केली. 

याबाबत त्यांनी सायबर पोलीसात तक्रार दिली असून त्यावरुन सायबर पोलीसांनी अज्ञाताविरुध्द कलम ४१९, ४२० भादंवी सहकलम माहिती तंत्रज्ञान अधिनियम ६६ (आय), ६६ (डी) नुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सारंग नवलकर करीत आहेत.

Web Title: A lawyer was cheated of Rs 1 lakh due to a fake Facebook account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.