देऊळघाट नजीक बिबट्ट्याचा शेतमजुरावर हल्ला

By निलेश जोशी | Published: December 2, 2023 04:47 PM2023-12-02T16:47:49+5:302023-12-02T16:48:21+5:30

जखमी शेत मजूरावर सध्या बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.

A leopard attacked a farm laborer near Deulghat | देऊळघाट नजीक बिबट्ट्याचा शेतमजुरावर हल्ला

देऊळघाट नजीक बिबट्ट्याचा शेतमजुरावर हल्ला

बुलढाणा: शेतात कामासाठी जात असलेल्या एका शेत मजूरावर बिबट्याने हल्ला करून जखमी केल्याची घटना २ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास बिरसिंगपूर शिवारात घडली. जखमी शेत मजूरावर सध्या बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.

राजू बाबुराव सोनुने (३०, रा. बिरसिंगपूर) असे जखमी झालेल्या शेत मजुराचे नाव आहे. बुलढाणा-देऊळघाट मार्गालालागून दलाल यांचे शेत आहे. या परिसरात असलेल्या एका झुडपात बिबट्या होता. राजू सोनुने हे शेतात कामासाठी जात असताना बिबट्याने झुडपातून बाहेर येत त्यांच्यावर अचानक झडप घालत त्यांना जखमी केले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे राजू सोनुने यांनी आरडा अेारड केली. त्यामुळे परिसरात असलेल्या शेतात काम करणाऱ्या लोकांनी घटनास्थळाकडे धाव घेत त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान झालेल्या गोंधळ व आवाजाने बिबट्याने तेथून पळ काढला. सध्या सोनुने यांच्यावर बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. बिबट्याने हल्ला केल्याची माहिती मिळाल्यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहोचत जखमीची विचारपूस करत घटनेची सविस्तर माहिती जाणून घेतली. सोबतच आरएफअेा अभिजित ठाकरे यांनी पथकासह घटनास्थळ गाठत पंचनामा केला. दुसरीकडे या परिसरात बिबट्ट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.

Web Title: A leopard attacked a farm laborer near Deulghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.