पालात बिबट्या घुसला! ६ मेंढ्या फस्त, ५ गंभीर; ढोरपगाव शिवारातील घटना
By अनिल गवई | Updated: May 28, 2024 17:02 IST2024-05-28T16:58:26+5:302024-05-28T17:02:07+5:30
मेंढपाळाच्या पालात घुसून बिबट्याने सहा मेंढ्या फस्त केल्या.

पालात बिबट्या घुसला! ६ मेंढ्या फस्त, ५ गंभीर; ढोरपगाव शिवारातील घटना
अनिल गवई,खामगाव : मेंढपाळाच्या पालात घुसून बिबट्याने सहा मेंढ्या फस्त केल्या. तर पाच मेंढ्यांना गंभीर जखमी केले. खामगाव तालुक्यातील ढोरपगाव शिवारात ही घटना मंगळवारी उघडकीस आली.
प्राप्त माहितीनुसार, विठ्ठल किसन कवडे यांचा गावालगत मेंढ्यांचा पाल असून या पालात त्यांच्या मेढ्या नेहमी बांधलेल्या राहतात. अशातच मध्यरात्री दरम्यान बिबट्याने या पालाला लक्ष्य केले. पालातील बांधून ठेवलेल्या सहा मेंढ्या फस्त केल्या. तर पाच मेंढ्यांना जखमी करून सोडले. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. त्यामुळे ढोरपगाव आणि परिसरात एकच खळबळ माजली असून, गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.