बोरखेडमध्ये पिंजऱ्यात अडकलेल्या बिबट्याला अंबाबरवा अभयारण्यात सोडले

By निलेश जोशी | Published: February 21, 2024 08:41 PM2024-02-21T20:41:16+5:302024-02-21T20:41:40+5:30

या बिबट्याला अंबाबरवा अभयारण्यातील चुनखडी बिटमध्ये सुखरूप सोडण्यात आले आहे.

A leopard trapped in a cage in Borkhed was released in Ambabarwa Sanctuary | बोरखेडमध्ये पिंजऱ्यात अडकलेल्या बिबट्याला अंबाबरवा अभयारण्यात सोडले

बोरखेडमध्ये पिंजऱ्यात अडकलेल्या बिबट्याला अंबाबरवा अभयारण्यात सोडले

बुलढाणा: वनपरीक्षेत्रातंर्गत बोरखेड शिवारात धुमाकुळ घालणाऱ्या बिबट्यास पिंजऱ्यात कैद करण्यात वनविभागाच्या बचाव पथकाला यश आले आहे. दरम्यान २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास या बिबट्याला अंबाबरवा अभयारण्यातील चुनखडी बिटमध्ये सुखरूप सोडण्यात आले आहे.

बोरखेड हे ज्ञानगंगा अभयारण्याला लागून आहे. नारायण खांडेभराड यांच्या शेता जवळ मागील अनेक दिवसांपासून बिबट फिरत असल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. नागरिकांनी या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी बुलढाणा वनविभागाकडे केली होती. त्यानुषंगाने शेतात रेस्क्यू टीमने पिंजरा लावला होता. २० फेब्रुवारी रोजी या पिंजऱ्यात २ वर्षाचा वर्षांचा नर बिबट कैद झाला. फिजीकल रेसक्यु केलेल्या या बिबट्याची बुलढाणा पशुधन विकास अधिकारी यांनी प्राथमिक तपासणी करून बिबट सुदृढ असल्याचा अहवाल दिला. त्यानुषंगाने नंतर बुलडाणा डीएफअेा सरोज गवस व एसीएफ अभिजित ठाकरे यांच्या आदेशानुसार बिबट्याला अंबाबरवा अभयारण्यातील चुनखडी बिटच्या नैसर्गिक अधिवासात २१ फेब्रुवारी रोजी सकाळी सोडण्यात आले. सदर कार्यवाही रेसक्यु टिम सदस्य संदीप मडावी, वसंता सावळे, प्रवीण सोनुने, दीपक गायकवाड, अमोल चव्हाण, देविदास बावस्कर, ऋषि हिवाळे यांनी पार पाडली.

ज्ञानगंगात ३९ बिबटे
बुलढाणा शहार नजकीच्या ज्ञानगंगा अभयारण्यात जब्बल ३९ बिबटे आहे. यासोबतच प्रादेशिकच्या वनक्षेत्रातही बुलढाणा शहरालगत जवळपास ८ बिबटे आहेत.

Web Title: A leopard trapped in a cage in Borkhed was released in Ambabarwa Sanctuary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.