अल्पवयीन वधूने प्रियकरासोबत लग्नाच्या आदल्या दिवशीच केले फिनाईल प्राशन
By अनिल गवई | Published: March 9, 2023 05:16 PM2023-03-09T17:16:27+5:302023-03-09T17:17:25+5:30
अल्पवयीन वधूने आपल्या प्रियकरासह िफनाईल प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.
लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: अल्पवयीन वधूने आपल्या प्रियकरासह फिनाईल प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. अल्पवयीन युवती आणि तिच्या प्रियकराने फिनाईल प्राशन केल्यानतर रात्री उशीरा थेट शहर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. आई वडिल आपल्या इच्छेविरोधात लग्न लावून देत असल्याची आपबिती कथन केली. तसेच त्यामुळे आपण प्रियकरासह फिनाईल प्राशन केल्याचे सांगितले. त्यामुळे शहर पोलीसांनी गुरूवारी अल्पवयीन मुलीच्या आई, वडिलांविरोधात बालविवाह प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. परिणामी, खामगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे.
शहरातील एका वस्तीत राहणाऱ्या १६ वर्षीय मुलीचे त्याच परिसरातील एका अल्पवयीन १८ वर्षीय मुलावर प्रेम आहे. मुलीच्या प्रेमप्रकरणाची माहिती घरच्यांना मिळताच, त्यांनी मुलीसाठी एक स्थळ शोधून तिचा विवाह ठरविला. नियोजित मुहूर्तानुसार गुरूवार ९ मार्च रोजी मुलीचा विवाह पार पडणार होता. दरम्यान, बुधवारी हळदीचा कार्यक्रम पार पडल्यानंतर मुलीने घर सोडून आपल्या प्रियकरासोबत िफनाईल प्राशन केले. त्यानंतर रात्री उशीरा थेट पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. पोलीसांकडे आई वडिलांच्या िवरोधात तक्रार दाखल करीत िफनाईल प्राशन केल्याची माहिती पोलीसांना दिली. त्यावरून पोलीसांनी दोघानांही तातडीने खामगाव येथील सामान्य रूग्णालयात दाखल केले. तर मुलीच्या तक्रारीवरून आई वडिलांविरोधात बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ च्या कलम ११ अन्वये गुन्हा दाखल केला.
सामान्य रूग्णालयात नातेवाईकांची एकच गर्दी
अल्पवयीन मुलीने प्रियकरासोबत पलायन आणि फिनाईल प्राशन केल्याची माहिती मुलीच्या नातेवाईकांना समजली. ही वार्ता वार्यासारखी परिसरात पसरली. त्यानंतर मुलाच्या नातेवाईकांनीही सामान्य रूग्णालयात धाव घेतली. यावेळी मुलगी आणि मुलीच्या नातेवाईकांमध्ये बाचाबाचीही झाली. मात्र, पोलीसांनी वेळीच प्रकरण निस्तारले.
वरपक्षात खळबळ
अल्पवयीन वधूच्या आई वडिलांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यामुळे या प्रकरणाचा चांगलाच धक्का वर पक्षातील मंडळींना बसला. सुरूवातीला वधू पळून गेल्याचा त्यांना निरोप मिळाला. या धक्क्यातून सावरत नाही तोच ितने प्रियकरासोबत िफनाईल प्राशन केले आणि तिच्या आई वडिलांिवरोधात गुन्हा दाखल झाल्याचे एकापाठोपाठ धक्के बसल्याने वर पक्षात चांगलाच सन्नाटा पसरल्याचे समजते. सुत्रानुसार या सर्व प्रकरणामुळे वर पक्ष भांबावल्याचेही समजते.