अल्पवयीन मुलीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
By संदीप वानखेडे | Updated: July 10, 2024 19:30 IST2024-07-10T19:29:41+5:302024-07-10T19:30:10+5:30
ही घटना बुलढाणा शहरातील चैतन्यवाडीत १० जुलै राेजी घडली. कोमल संदीप सुसर असे मृतक मुलीचे नाव आहे.

अल्पवयीन मुलीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
बुलढाणा : सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने १५ वर्षीय मुलीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुलढाणा शहरातील चैतन्यवाडीत १० जुलै राेजी घडली. कोमल संदीप सुसर असे मृतक मुलीचे नाव आहे.
बुलढाणा तालुक्यातील शिरपूर येथील संदीप सुसर हे मुलांच्या शिक्षणासाठी बुलढाणा शहरात राहतात. त्यांची कोमल ही मुलगी दहाव्या वर्गात शिक्षण घेत आहे. तिची शहरातील एका खासगी क्लासमध्ये शिकवणी लावलेली आहे. या खासगी क्लासचा पेपर ९ जुलै रोजी झाला. यामध्ये तिला कमी गुण मिळाले होते. १० जुलै रोजी ती बाहेर जात असल्याचे सांगून घराबाहेर पडली. बराच वेळ झाल्यानंतर ती घरी न परतल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला; मात्र ती सापडली नाही.
अखेर वाड्यातील विहिरीत तिचा मृतदेह आढळला. या प्रकरणी रामदास सुसर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १९४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास बुलढाणा शहर पोलीस करीत आहेत.