धावत्या दुचाकीवर चिमुकलीला दूध पाजणाऱ्या मातेला काळाने हेरले!
By अनिल गवई | Published: December 20, 2022 05:07 PM2022-12-20T17:07:57+5:302022-12-20T17:08:36+5:30
चिमुकली जखमी: डोक्यावर पडल्याने गंभीर जखमी झालेल्या मातेचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: चिमुकलीसह दुचाकीवरून प्रवास करणाºया एका मातेला दुर्देवी काळाने हेरले. चिमुकली जीवाच्या आंकांताने रडत असल्याने दुचाकीवर दुध पाजताना पडल्याने मातेचा करूण अंत झाला. हृदय पिळवटून टाकणारी ही घटना सोमवारी सायंकाळी खामगाव-अकोला रस्त्यावरील कोलोरी फाट्यानजीक घडली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
अकोला येथील चौरे प्लॉट भागातील शीतल आबाराव देशमुख नामक विवाहिता चिमुकलीसह दुचाकीवरून प्रवास करीत होती. दरम्यान, चिमुकली रडायला लागल्याने तिला धावत्या गाडीवरच दूध पाजत असताना डोक्यावर पडल्याने शीतल गंभीर जखमी झाल्या. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रूग्णालयात आणण्यात आले. खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रूग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचारार्थ दाखल करण्यात आले. दरम्यान, तपासणीअंती उपस्थित डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. याप्रकरणी डॉ. सचिन बघे यांच्यावतीने कक्षसेवक विलास वडोदे यांनी दिलेल्या माहितीवरून शहर पोलिसांनी मंगळवारी महिलेल्या मृत्यू प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
चिमुकली बालंबाल बचावली
- चिमुकलीसह अकोला येथील देशमुख दामप्त्य अकोला येथे खामगावहून परत होते. दरम्यान, कोलोरी जवळ दोन वर्षांच्या रियांशी नामक चिमुकलीला दूध पाजताना तिची आई शीतल चिमुकलीसह रोडवर पडली. यात गंभीर दुखापत झाल्याने शीतल देशमुख यांचा मृत्यू झाला. तर चिमुकली रियांशी बालंबाल बचावली. तिच्यावर खामगाव येथील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"