समृद्धी महामार्गामुळे विदर्भ मराठवाड्यासाठी विकासाचा नवा अध्याय- कराड

By निलेश जोशी | Published: December 4, 2022 03:26 PM2022-12-04T15:26:03+5:302022-12-04T15:26:20+5:30

समृद्धी महामार्ग महाराष्ट्रासाठी विकासाचा महामार्ग ठरणार असून विदर्भ मराठवाड्याच्या विकासाचा नवा अध्याय या महामार्गामुळे निर्माण होईल

A new chapter of development for Vidarbha Marathwada due to Samriddhi Highway- Karad | समृद्धी महामार्गामुळे विदर्भ मराठवाड्यासाठी विकासाचा नवा अध्याय- कराड

समृद्धी महामार्गामुळे विदर्भ मराठवाड्यासाठी विकासाचा नवा अध्याय- कराड

Next

सिंदखेड राजा:

समृद्धी महामार्ग महाराष्ट्रासाठी विकासाचा महामार्ग ठरणार असून विदर्भ मराठवाड्याच्या विकासाचा नवा अध्याय या महामार्गामुळे निर्माण होईल, असे मत केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी किनगाव राजा येथे रविवारी व्यक्त केले.

दरम्यान, हिंदुहृदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला दिलेली मोठी देणं आहे. त्यांच्या म्हत्वाकांक्षेमुळेच हा महामार्ग अस्तित्वात आला असल्याचेही ते म्हणाले. डॉ. कराड हे हिंगोलीकडे जात असताना काही वेळ त्यांनी किनगाव राजा येथील त्यांचे स्नेही डॉ. शिवानंद जायभाये यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना त्यांनी उपरोक्त भावना व्यक्त केल्या. सोबतच व्यापार, दळणवळणाच्या सुविधा वाढल्याने कृषी माल अनेक शहरात अल्पावधीत पोहोचविता येणार आहे. त्यामुळे शेतकरी देखील सुखावणार असल्याचे डॉ. कराड म्हणाले. स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे काम व कर्तुत्व मोठे होते, त्यामुळे समृद्धी महामार्गाला दिलेले त्यांचे नाव अत्यंत योग्य असल्याचे ते म्हणाले.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर वरून निघून शिर्डी पर्यंत समृद्धी महामार्गाची पाहणी केली. वास्तविक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना हा महामार्ग त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता, समृद्धी महामार्ग ज्या जिल्ह्यातून जात आहे त्या भागाचा विकास आता कोणी रोखू शकणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी डॉ. शिवानंद जायभाये,नंदकिशोर मांटे, शिवाजीराव काळुसे, सुभाषराव घिके, खुशालराव नागरे, डॉ.ज्ञानेश्वर पातुरकर, दीपक पडुळकर, भरत जायभाये प्रामुख्याने उपस्थित होते.

Web Title: A new chapter of development for Vidarbha Marathwada due to Samriddhi Highway- Karad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.