खड्ड्यात पडल्याने इसमाचा मृत्यू; माटरगाव येथील घटना
By अनिल गवई | Updated: May 18, 2024 14:43 IST2024-05-18T14:42:45+5:302024-05-18T14:43:07+5:30
तपासणीअंती डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या दुर्देवी घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे

खड्ड्यात पडल्याने इसमाचा मृत्यू; माटरगाव येथील घटना
खामगाव: रस्त्याने घरी जात असताना शौचालयाच्या खड्ड्यात पडल्याने एका वृध्द इसमाचा मृत्यू झाला. शेगाव तालुक्यातील माटरगाव येथे ही घटना शनिवारी सकाळी घटना घडली. गजानन रामचंद्र वानखडे ६० असे मृतक वृध्दाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, गजानन वानखडे शनिवारी सकाळी गावातील रस्त्याने घरी जात होते. दरम्यान, तोल गेल्याने रस्त्यात खोदलेल्या शौचालयाच्या खड्यात ते पडले. ही घटना निदर्शनास येताच नातेवाईक आणि प्रत्यक्षदर्शींनी वानखडे यांना खामगाव येथील सामान्य रूग्णालयात भरती केले. तेथे तपासणीअंती डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या दुर्देवी घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.