डोणगावनजीक समृद्धीवर खासगी प्रवाशी बस उलटली; दोघे जखमी, ५४ प्रवाशी सुखरूप

By निलेश जोशी | Published: June 5, 2024 04:46 PM2024-06-05T16:46:45+5:302024-06-05T16:48:20+5:30

हा अपघात बुधवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास घडला

A private passenger bus overturned on Samruddhi Mahamarg near Dongaon Two injured, 54 passengers safe | डोणगावनजीक समृद्धीवर खासगी प्रवाशी बस उलटली; दोघे जखमी, ५४ प्रवाशी सुखरूप

डोणगावनजीक समृद्धीवर खासगी प्रवाशी बस उलटली; दोघे जखमी, ५४ प्रवाशी सुखरूप

नीलेश जोशी, बुलढाणा: समृद्धी महामार्गावर मेहकर तालुक्यातील डोणगाव नजीक छत्तीसगडमधून पुण्याला जाणारी प्रवाशी बस उलटून झालेल्या अपघातामध्ये दोन प्रवाशी जखमी झाले. हा अपघात बुधवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास घडला. सुदैवाने बसमधील ५४ प्रवाशी सुरक्षित आहेत.

छत्तीसगडमधून पुणे येथे खासगी प्रवाशी बस जात होती. ५ जून रोजी पहाटे समृद्धी महामार्गावर चॅनल क्रमांक १६७ जवळ असलेल्या पेट्रोलपंप नजीक चालकाला डुलकी लागल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात झाला. त्यात बस महामार्गाच्या कडेलाच उलटली. यामध्ये देविदास धुर्वे आणि राज बब्बर हे दोन प्रवाशी जखमी झाले. त्यांना रुग्णवाहिकेद्वारे त्वरित मेहकर येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

अपघाताचे वृत्त कळताच डोणगाव पोलिस ठाण्यातील पोलिस कॉन्स्टेबल पवन गाभणे, आनंदा चोपडे, नितीन डुकरे आणि चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेऊन सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. दरम्यान बसमध्ये एकूण ५६ प्रवाशी होते. त्यापैकी दोघेजण जखमी झाले होते. ५४ प्रवाशांना दुसऱ्या वाहनाद्वारे पुढे पाठविण्यात आले आहे.

Web Title: A private passenger bus overturned on Samruddhi Mahamarg near Dongaon Two injured, 54 passengers safe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.