भरधाव दुचाकी झाडावर आदळली, सैनिकासह दाेघे ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2024 10:40 PM2024-06-03T22:40:41+5:302024-06-03T22:40:52+5:30

माेताळा ते वडगाव रस्त्यावरील अंत्री शिवारातील घटना

A speeding bike hits a tree killing two including a soldier | भरधाव दुचाकी झाडावर आदळली, सैनिकासह दाेघे ठार

भरधाव दुचाकी झाडावर आदळली, सैनिकासह दाेघे ठार

संदीप वानखडे / बुलढाणा, मोताळा : भरधाव दुचाकी झाडावर आदळल्याने सैन्यातील जवानासह दाेघे ठार झाले. ही घटना ३ जून राेजी सायंकाळी पाच वाजता माेताळा ते वडगाव रस्त्यावर अंत्री शिवारात घडली. दीपक महादेव पवार (रा. अंत्री) आणि गजानन जगदेव सोळंके (रा. लिहा) अशी मृतांची नावे आहेत.


माेताळा तालुक्यातील अंत्री येथील दीपक महादेव पवार आणि लिहा येथील गजानन जगदेव सोळंके हे दोघे मावसभाऊ आज ३ जून रोजी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास एम.एच. २८/ ए. एक्स./ ५७०५ क्रमांकाच्या दुचाकीने मोताळ्याकडून वडगावकडे जात होते. दरम्यान अंत्री शिवारात त्यांची भरधाव दुचाकी रस्त्यालगत असलेल्या झाडावर धडकली. या अपघातात दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले होते. घटनेची माहिती मिळताच बोराखेडी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस उपनिरीक्षक यशवंत तायडे, पोकॉ. सुनील भवटे आणि गणेश सूर्यवंशी यांनी घटनास्थळी धाव घेत उपस्थित नागरिकांच्या मदतीने दोघांना उपचारासाठी बुलढाणा येथील सामान्य रुग्णालयात हलविले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यातील मृत गजानन सोळंके हे आर्मीत असून १५ दिवसांच्या रजेवर घरी आले होते. वृत्त लिहेपर्यंत बोराखेडी पोलिसांत कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल करण्यात आली नव्हती.


१५ दिवसांच्या सुटीवर आले हाेते साेळंके
भारतीय सैन्यात अरुणाचल प्रदेशमध्ये कार्यरत असलेले जवान गजानन जगदेव सोळंके हे अरुणाचल प्रदेशमध्ये कार्यरत आहेत. पाच-सहा दिवसांअगोदरच ते सुट्टीवर आपल्या गावी लिहा येथे आले. पुणे येथे विमानतळावर कार्यरत दीपक महादेव पवार यांना भेटण्यासाठी त्यांनी पुण्यावरून बाेलावले हाेते. दोघेही दुपारी दुचाकीने मोताळा येथे गेले होते. तेथून सायंकाळी गावाकडे परत येत असताना त्यांच्यावर काळाने झडप घातली.

Web Title: A speeding bike hits a tree killing two including a soldier

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.