समृद्धी महामार्गावर भरधाव खासगी बस ट्रकवर आदळली, दोन गंभीर
By संदीप वानखेडे | Updated: June 18, 2024 14:48 IST2024-06-18T14:48:10+5:302024-06-18T14:48:20+5:30
अपघातानंतर समृद्धी महामार्गावर वाहतुक विस्कळीत झाली होती.

समृद्धी महामार्गावर भरधाव खासगी बस ट्रकवर आदळली, दोन गंभीर
दुसरबीड : समृद्धी महामार्गावर भरधाव खासगी बस समोरील ट्रकवर आदळल्याने चालक व क्लिनर जखमी झाले. ही घटना १८ जून रोजी सकाळी ५ वाजता घडली. महादेव मोतीराम राऊत व ज्ञानेश्वर वानखेडे असे जखमींची नाव आहेत. अपघातानंतर समृद्धी महामार्गावर वाहतुक विस्कळीत झाली होती.
खासगी बस क्रमांक एम एच ३७ टी ८००० पुण्यावरून पुसदकडे जात जात होती. समृद्धी महामार्गावर दुसरबीडजवळ चॅनल क्र ३१८ नागपूर कॉरीडोअवर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही बस समोरील ट्रक क्रमांक सीजी ०७ बीई ८५२१ वर मागून आदळली. यामध्ये चालक महादेव राऊत व क्लीनर ज्ञानेश्वर वानखेडे हे गंभीर जखमी झाले.
सुदैवाने बसमधील प्रवाशी बचावले. या बसमध्ये २० प्रवाशी होते. घटनेची माहिती मिळताच किनगाव राजा पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेवून जखमींना बिबी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींवर उपचार सुरू आहेत.