हिवरखेड येथे मेंढ्यांच्या कळपावर वाघाचा हल्ला! मेंढ्यासह ६५ कोकरे ठार

By अनिल गवई | Published: September 7, 2023 12:18 PM2023-09-07T12:18:06+5:302023-09-07T12:19:01+5:30

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, वन आणि महसूल विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाल्याचे समजते.

A tiger attacked a herd of sheep at Hiwarkhed! 65 lambs were killed along with the sheep | हिवरखेड येथे मेंढ्यांच्या कळपावर वाघाचा हल्ला! मेंढ्यासह ६५ कोकरे ठार

हिवरखेड येथे मेंढ्यांच्या कळपावर वाघाचा हल्ला! मेंढ्यासह ६५ कोकरे ठार

googlenewsNext

खामगाव: वाघाच्या हल्ल्यात मेंढ्यासह ६५ कोकरे ठार झाली. खामगाव तालुक्यातील हिवरखेड शिवारात पहाटे साडेचार वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, वन आणि महसूल विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाल्याचे समजते.

याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, खामगाव तालुक्यातील हिवरखेड शिवारात गुरूवारी पहाटे एका चवताळलेल्या वन्यजीवाने अक्षरक्ष: धुमाकुळ घातला. मेंढपाळांच्या  मेंढ्याच्या कळपात घुसून नवजात कोकरे, लहान मोठ्या मेंढ्यासह ६५ जनावरांचा बळी घेतला. आणखी काही जनावरे गायब असल्याचा प्राथमिक अंदाज मेंढपाळांनी व्यक्त केला आहे. या घटनेची माहिती िमळताच तलाठी, ग्रामसेवक आणि कर्मचारी  घटनास्थळी दाखल झाले होते. 

मेंढपाळाचे मोठे नुकसान
चवताळलेल्या वन्यजीवाने काही समजण्याच्या आतच मेंढयाच्या विविध कळपांमध्ये घुसून मेंढ्यांवर हल्ला केला. ३५ ते ४० कोकरे आणि २५ लहान मोठ्या मेंढ्या मारल्या. त्यामुळे आर्थिक संकटात असलेल्या मेंढपाळांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, हल्ला करणारे जनावर हे वाघ की बिबट याबाबत घटनास्थळी मतभिन्नता दिसून आली. वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतरच या प्रकरणी उलगडा होण्याची शक्यता आहे.

अशी मारली मेंढपाळांची जनावरे
कौतिक हटकर : १७
मुरलीधर कोळपे: ११
दादाराव कोळपे: १२
कासम पारखे: १०
दशरथ कोळपे: १०
वामन हटकर: ०५

Web Title: A tiger attacked a herd of sheep at Hiwarkhed! 65 lambs were killed along with the sheep

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.