मूल्याधिष्ठीत समाजपद्धती आपली ताकद; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मत
By संदीप वानखेडे | Published: August 18, 2023 06:49 PM2023-08-18T18:49:53+5:302023-08-18T18:50:32+5:30
बुलढाणा: मुल्याधिष्ठीत समाजपद्धती ही आपली खरी ताकद आहे. काळानुरुप संदर्भ बदलत गेले तरी आपली ही ताकद जीवन जगतांना महत्त्वाची ...
बुलढाणा: मुल्याधिष्ठीत समाजपद्धती ही आपली खरी ताकद आहे. काळानुरुप संदर्भ बदलत गेले तरी आपली ही ताकद जीवन जगतांना महत्त्वाची भूमिका निभावत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
बुलढाणा शहरातील गर्दे वाचनालयातर्फे आयोजित गोकुल शर्मा यांच्या अमृत महोत्सवानिमित्त कार्यक्रमात ते बाेलत हाेते़ ते पुढे म्हणाले की, सध्या विश्वगुरू हाेण्याची कल्पना आपण करत आहाेत़ त्यासाठी समाज प्रगल्भ हाेण्यासाेबतच ज्ञान, संस्कार, भाैतिक आर्थिक प्रगीतीसाेबत नॉलेज ट्रान्सफॉर्मेशन महत्त्वपूर्ण आहे़ पूर्वीच्या काळामध्ये ज्ञान मिळवण्यासाठी ग्रंथालयाचा वापर हाेत हाेता़ आता ज्ञान मिळवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर हाेत आहे, असेही ते म्हणाले़ यावेळी खासदार प्रतापराव जाधव, आमदार श्वेता महाले, आमदार संजय रायमुलकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित हाेते.