वीज काेसळल्याने भानखेड येथील महिलेचा मृत्यू
By संदीप वानखेडे | Updated: April 16, 2024 18:14 IST2024-04-16T18:13:26+5:302024-04-16T18:14:04+5:30
सिंधूबाई सुरडकर ह्या दशक्रिया विधीसाठी भानखेड जवळील धरणावर गेल्या होत्या.

प्रतिकात्मक फोटो...
चिखली : तालुक्यात १६ एप्रिलच्या दुपारी विजांच्या कडकडाटासह अवकाळीच्या सरी कोसळल्या. यादरम्यान तालुक्यातील भानखेड येथे एका ५० वर्षीय महिलेवर वीज कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सिंधूबाई कौतिकराव सुरडकर (वय ५०) असे मृतक महिलेचे नाव आहे.
सिंधूबाई सुरडकर ह्या दशक्रिया विधीसाठी भानखेड जवळील धरणावर गेल्या होत्या. यादरम्यान पाणी आणण्यासाठी गेल्या असता विजांच्या कडकडाटासह अचानकपणे अवकाळी पाऊस सुरू झाला व त्यांच्यावर वीज कोसळली. या दुर्दैवी घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर त्यांच्यासमवेत असलेल्या अन्य काही महिला जखमी झाल्याची माहिती आहे. दरम्यान, चिखली तालुक्यातील अनेक गावांमध्ये १६ एप्रिल राेजी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे उन्हाळी पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले.