मलकापूर स्थानकात महिलेने घेतली धावत्या गाडीतून उडी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2023 03:52 PM2023-07-22T15:52:08+5:302023-07-22T15:52:24+5:30

गुरुवारी दोन महिला व एक मुलगा गाडीच्या बोगीमध्ये गर्दीतून वाढ काढत चढत होत्या. दरम्यान, एक महिला व मुलगा बोगीमध्ये चढला. इतक्यात गाडी चालू झाली.

A woman jumped from a running train at Malkapur station | मलकापूर स्थानकात महिलेने घेतली धावत्या गाडीतून उडी

मलकापूर स्थानकात महिलेने घेतली धावत्या गाडीतून उडी

googlenewsNext

मलकापूर (बुलढाणा) : अमरावती-मुंबई एक्सप्रेसमध्ये चढत असताना प्रवाशांमध्ये २० जुलै रोजी एकच गर्दी झाली. यावेळी बोगीत चढताना सहप्रवासी महिला फलाटावर राहिल्यामुळे महिलेने धावत्या गाडीतून उडी घेतली. हा प्रकार प्रवाशांच्या निदर्शनास येताच, त्यांनी महिलेला उचलल्याने पुढील अनर्थ टळला.

गुरुवारी दोन महिला व एक मुलगा गाडीच्या बोगीमध्ये गर्दीतून वाढ काढत चढत होत्या. दरम्यान, एक महिला व मुलगा बोगीमध्ये चढला. इतक्यात गाडी चालू झाली. तर दुसरी एक महिला फलाटावरच राहिली. गर्दीत धांदल उडाल्याने तिला बोगीमध्ये चढता आले नाही. मुलाची आई फलाटावर राहिल्यामुळे बोगीत चढलेल्या महिलेने धावत्या गाडीतून उडी मारली. दृश्य पाहणाऱ्या रेल्वे स्थानकावरील प्रवाशांनी आरडाओरड केली. त्या प्रवाशांचे ओरडणे पाहून गार्डने गाडी थांबवली. चालू गाडीतून उडी मारलेल्या महिलेला स्थानिक यात्रेकरूंनी उचलले. थांबलेल्या अमरावती-मुंबई एक्सप्रेसमध्ये बसवले. यावेळी गार्डने गाडी थांबवल्यामुळे पुढील अनर्थ टळला. अमरावती-मुंबई गाडीला बोगी कमी असल्यामुळे अनेकांनी रोष व्यक्त केला. प्रवाशांच्या मागणीला डॉ. तलरेजा यांनी समर्थन देत मुद्दा रेटून धरला.

प्रवाशांनी बोगीत चढता अथवा उतरताना स्वत:ची काळजी घ्यावी. एखादा प्रसंग उद्भवल्यास धावत्या गाडीमधून उडी मारू नये. आवश्यकता वाटल्यास चेन ओढून गाडी थांबवावी.
- राजपूत,

रेल्वे स्टेशन प्रबंधक, मलकापूर

Web Title: A woman jumped from a running train at Malkapur station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.