जलाशयात पोहण्यासाठी उतरलेल्या युवकाचा बुडून मृत्यू, तिघांवर गुन्हा
By संदीप वानखेडे | Published: May 3, 2024 04:51 PM2024-05-03T16:51:09+5:302024-05-03T16:52:28+5:30
गव्हाण शिवारात असलेल्या संत चोखामेळा जलाशयात पोहण्यासाठी उतरलेल्या महेफुज शेख मुखतार (२०) यांचा २ मे राेजी मृत्यू झाला हाेता.
संदीप वानखडे, देऊळगाव राजा : तालुक्यातील खल्याळ गव्हाण शिवारात असलेल्या संत चोखामेळा जलाशयात पोहण्यासाठी उतरलेल्या महेफुज शेख मुखतार (२०) यांचा २ मे राेजी मृत्यू झाला हाेता. या प्रकरणी मृताच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून पाेलिसांनी ३ मे रोजी तिघांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे़
खल्याळ गव्हाण येथील संत चाेखामेळा जलाशयात महेफुज शेख मुखतार हे २ मे रोजी उतरले हाेते़. पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडाल्याने मृत्यू झाला़. या प्रकरणी दरम्यान मृताचा भाऊ शेख सोहील शेख मुखतार (रा. खल्ल्याळ गव्हाण) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माझ्या भावाला आरोपी कृष्णा भानुदास जोशी, देवानंद श्रीनिवास डोईफोडे, विनोद खंडूजी मांटे यांनी जलाशयात मोटार लोटायच्या कामासाठी नेले होते़. त्याला पोहणे येत नसल्याचे माहीत असूनही त्याला पाण्यात उतरविले व पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडून मरण पावला. त्याच्या मृत्यूला कृष्णा भानुदास जोशी, देवानंद श्रीनिवास डोईफोडे, विनोद खंडूजी मांटे हे तिघेही कारणीभूत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे़. या प्रकरणी तिघांविरुद्ध पाेलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़. पुढील तपास पोलिस निरीक्षक संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक हेमंत शिंदे करीत आहेत़.