लाेणार येथील स्टेट बँकेतील आधार केंद्र बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:38 IST2021-09-06T04:38:12+5:302021-09-06T04:38:12+5:30
लाेणार : आधारकार्ड हे सर्व शासकीय सेवा, अन्य शासकीय लाभ, बँकिंग यासह वैयक्तिक कामासाठी महत्त्वपूर्ण ओळखीचा पुरावा म्हणून ...

लाेणार येथील स्टेट बँकेतील आधार केंद्र बंद
लाेणार : आधारकार्ड हे सर्व शासकीय सेवा, अन्य शासकीय लाभ, बँकिंग यासह वैयक्तिक कामासाठी महत्त्वपूर्ण ओळखीचा पुरावा म्हणून आवश्यक आहे. नवीन आधार काढण्यासाठी आणि अपडेट करण्यासाठी लाेणार येथील स्टेट बँकेच्या शाखेत सुरू कसलेले केंद्र बंद करण्यात आले आहे़ त्यामुळे, नागरिकांची नवीन आधार काढण्यासाठी आणि दुरुस्तीसाठी भटकंती हाेत आहे़
शहरांमध्ये केवळ एकच आधार केंद्र असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. लोकसंख्या पाहता आधार केंद्रांमध्ये वाढ होणे गरजेचे आहे़ परंतु भारतीय स्टेट बँकमधील आधार केंद्र हे बंद असल्यामुळे नागरिकांना हेलपाटे होत आहेत. एकीकडे आधारकार्ड हा महत्त्वाचा पुरावा आहे. हा सर्व शासकीय व अशासकीय कामांमध्ये वापरला जात आहे. त्यात अनेक चुका राहिल्याने नागरिकांना आता त्रास होत आहे. त्यामध्ये नावात चुका, पत्ता चुकीचा, अस्पष्ट फोटो, मोबाइल क्रमांक अपडेट व अन्य चुका अनेकांच्या आधारकार्डवर राहिल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना त्या चुका दुरुस्त करण्यासाठी आधार केंद्रावर जाऊन दुरुस्त करणे आवश्यक असते़ परंतु भारतीय स्टेट बँकेमध्ये आधार केंद्र हे बंद असल्यामुळे नागरिकांना बँकेत येऊन परत जावे लागत आहे़ त्यामुळे त्यांना आर्थिक फटका बसत आहे.
ग्राहकांना याेग्य मार्गदर्शनच मिळत नाही
भारतीय स्टेट बँकेमधील बँक खात्याला आधार लिंक करणे मोबाइल लिंक करणे, सही दुरुस्त करणे अशी अनेक कामे करण्यासाठी वयोवृद्ध नागरिक विद्यार्थी कामासाठी येतात. परंतु बँकेमध्ये संबंधित काउंटरवर योग्य ते मार्गदर्शन न करता खातेदारांना जाणून बुजून त्रास देतात. काही आपल्या मर्जीतील खातेधारकांना कउंटरच्या आत बोलावून कामे केली जातात. अशा प्रकारे भारतीय स्टेट बँकेमध्ये दुजाभाव केला जात आहे.