बीडीसीसीच्या ४,५०० हजार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2020 02:32 PM2020-03-02T14:32:16+5:302020-03-02T14:32:29+5:30
आतापर्यंत चार हजार ४३४ शेतकºयांचे आधार प्रमाणिकरण झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: शेतकरी कर्जमाफी योजनेच्या आधार प्रमाणिकरणाने आता वेग घेतला असून बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या २१ हजार ३२५ शेतकऱ्यांची माहिती बँकेने अपलोड केली असून त्यापैकी आतापर्यंत चार हजार ४३४ शेतकºयांचे आधार प्रमाणिकरण झाले आहे.
दरम्यान, आधार प्रमाणिकरण शिल्लक असलेल्या खात्यांची संख्या ही १५ हजार ५५३ असून २५ खाती ही अद्याप अपलोड झालेली नाहीत. त्यादृष्टीने जिल्हा केंद्रीय सहकारी बँक प्रयत्नरत आहेत. जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या जवळपास २१ हजार ३५० शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. त्यापैकी २१ हजार ३२५ शेतकºयांची माहिती पोर्टलवर अपलोड झालेली आहे. निकषानुसार अपात्र असलेली कर्जखाती ही ४२८ आहेत.
८३ खात्यात ५१ लाखांची रक्कम
जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या २१ हजार ३३१ शेतकºयांपैकी आधार प्रमाणिकरण झालेल्या ८३ शेतकºयांच्या खात्यात ५१ लाख रुपयांची कर्जमाफीची रक्कम जमा झालेली आहे. जिल्हा बँकेच्या कर्जदार शेतकºयांना जवळपास १३२ कोटी ३२ लाख रुपयांची कर्जमाफी होणार आहे. त्यादृष्टीने पहिल्याच प्रायोगिकस्तरावरील उपक्रमात ५१ लाख रुपयांची रक्कम शेतकºयांच्या खात्यात जमा झाली आहे. आधार प्रमाणिकरण झालेल्या शेतकºयांच्या खात्यात टप्प्या टप्प्याने ही रक्कम जमा होणार आहे. दरम्यान काही शेतकºयांच्या खात्यात पीक विम्याची जवळपास दहा कोटी रुपयांची रक्कमही जमा झाली असल्याची माहिती सुत्रांनी दिली.