'आई  प्रोगाम' राज्यातील पहिला प्रयोग बुलडाणा जिल्ह्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 05:24 PM2018-12-01T17:24:22+5:302018-12-01T17:24:51+5:30

दरदिवशी एक रुपया गोळा करून साठवलेली रक्कम त्या महिलेला दिली जाते. यासाठी 'आई प्रोग्राम' राबविण्यात येत असून राज्यातील हा पहिला प्रयोग मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्यातच सुरू आहे.

 'Aai program' is the first experiment in the state of Buldhana district | 'आई  प्रोगाम' राज्यातील पहिला प्रयोग बुलडाणा जिल्ह्यात

'आई  प्रोगाम' राज्यातील पहिला प्रयोग बुलडाणा जिल्ह्यात

googlenewsNext

- ब्रम्हानंद जाधव

 बुलडाणा: प्रवासखर्च झेपत नसल्यामुळे एचआयव्ही ग्रस्त माता आपल्या बालकांना नियमित एचआयव्ही संबधीत असलेल्या तपासणीसाठी टाळाटाळ करतात, अशा महिलांसाठी मदत म्हणून या विभागातील प्रत्येक कर्मचाºयाकडून दरदिवशी एक रुपया गोळा करून साठवलेली रक्कम त्या महिलेला दिली जाते. यासाठी 'आई प्रोग्राम' राबविण्यात येत असून राज्यातील हा पहिला प्रयोग मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्यातच सुरू आहे. त्यामुळे आतापर्यंत ५० हजार रुपयांपर्यंत मदत देण्यात आली असून एचआयव्हीग्रस्त माता-पित्यांच्या जगण्याला उमेद मिळत आहे.
एचआयव्हीग्रस्त आई-वडिलांचे मुलं भविष्यात एचआयव्हीमूक्त व्हावे, यासाठी आरोग्य विभागाकडून विशेष लक्ष देण्यात येत आहे. गरोदर महिलांच्या वेळोवेळी तपासण्या, औषधी देणे, मुल जन्माला आल्यानंतर १८ महिन्यापर्यंत त्यांच्या तपासण्या करणे, याची काळजी घेणे गरजेचे आहे. मुलांची तपासणी करण्यासाठी जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण विभागाकडून आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय अशा ठिकाणी तपासणी केंद्र उपलब्ध करण्यात आले आहेत. परंतू ज्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे, प्रवासखर्च झेपत नाही, असे काही एचआयव्हीग्रस्त माता आपल्या बालकांना नियमित एच.आय.व्ही. संबंधित असलेली सहा आठवडे, सहा महिने, १२ महिने व शेवटची १८ महिन्याच्या तपासणीसाठी टाळाटाळ करतात. अशा महिलांसाठी शासनातर्फे कुठलीही मदत नसल्यामुळे डाप्कु, आयसीटीसीए, ब्लड बँक व इतर विभागातील सर्व कर्मचारी मिळून मदत करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. ह्यआईह्ण नावाची ही योजना एकमेव बुलडाणा जिल्ह्यात सुरू असून प्रत्येक कर्मचारी दरदिवशी एक रुपया गोळा करतो, याप्रमाणे एका कर्मचाºयाचे महिन्याला ३० रुपये गोळा होतात. एकूण ५० कर्मचारी असल्याने दीड हजार रुपयांपर्यत महिन्याची रक्कम गोळा होत आहे. ही सर्व गोळा केलेली रक्कम एचआयव्हीग्रस्त मातेला आपल्या बालकाच्या तपासणीसाठी दिल्या जाते. यामुळे सर्व मुलांच्या तपासण्या करणे सोपे झाले आहे.
 
अशी आहे   योजना
आई योजना ही जिल्ह्यात कार्यरत असलेल्या डाप्कु, आय. सी. टी. सी., ब्लड बँक व एस. टी. डी. या विभागाच्या कर्मचाºयांनी सुरू केली आहे. यामध्ये आशा चा 'आ' आणि ईआयडी चा 'ई' असे दोन शब्द मिळुन 'आई' असे नामकरण करण्यात आले आहे. या योजनेंतर्गत एचआयव्ही संसर्गित मुलांची एचआयव्ही तपासणी व्हावी व त्यांच्यातील एच.आय.व्ही. चे प्रमाण कमी व्हावे, यासाठी प्रवासखर्च दिला जातो.

३०० बालकांना मदत
१ डिसेंबर जागतिक एड्स प्रतिबंधक दिनी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागाकडून जिल्ह्यातील एड्स रुग्णांसाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची स्थिती जाणून घेतली असता आई प्रोग्रामच्या माध्यमातून जिल्ह्यातील ३०० बालकांना मदत मिळाल्याची माहिती समोर आली. हा उपक्रम एकमेव बुलडाणा जिल्ह्यातच राबविण्यात येत असून राज्यातील इतर जिल्ह्यांसाठी एक आदर्श उपक्रम ठरत आहे.


प्रवासखर्चाअभावी काही एचआयव्ही ग्रस्त मातांना आपल्या बालाकांच्या नियमीत तपासणीसाठी अडचणी येतात. जिल्ह्यातील अशा मातांसाठी आई योजनेचा मोठा आधार होत आहे. आतापर्यंत ३०० बालकांना तपासणीसाठी आर्थिक मदत देण्यात आली असून राज्यात एकमेव बुलडाणा जिल्ह्यात सुरू असलेल्या या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
- प्रमोद टाले, जिल्हा कार्यक्रम अधिकारी,
जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रम, बुलडाणा.

Web Title:  'Aai program' is the first experiment in the state of Buldhana district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.