आम आदमी विमा योजनेची नोंदणी आता ऑनलाइन

By Admin | Published: April 17, 2015 01:26 AM2015-04-17T01:26:55+5:302015-04-17T01:26:55+5:30

तलाठय़ाकडून अर्ज भरुन ऑनलाइन सादर करण्याचे अवाहन; आधार क्रमांक आवश्यकच.

Aam Aadmi Insurance plan is now available online | आम आदमी विमा योजनेची नोंदणी आता ऑनलाइन

आम आदमी विमा योजनेची नोंदणी आता ऑनलाइन

googlenewsNext

बुलडाणा : केंद्र शासनाने राज्यात २ ऑक्टोंबर २00७ पासून आम आदमी विमा योजना सुरू केली. या योजनेत भारतीय आयुर्विमा महामंडळाकडून पात्र लाभार्थ्यांचा विमा उतरविण्यात येतो. या योजनेतील लाभार्थ्यांंंचा केंद्र शासनाकडून १00 रूपये व राज्य शासनाकडून १00 असे एकूण २00 रूपय प्रति लाभार्थी वार्षिक हप्ता शासनाकडून महामंडळाला देण्यात येतो. या योजनेतील अर्ज आता आपल्या जवळच्या संबंधित महा ई सेवा केंद्रात जावून ऑनलाईन भरून देण्यात यावा. असे आवाहन जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर यांनी १५ एप्रिल रोजी आयोजित बैठकीत केले. या योजनेसाठी लाभार्थी हा ग्रामीण भागातील भुमिहीन कुटूंबातील १८ ते ५९ वयोगटातील रोजगार करणारे कुटूंब प्रमुख किंवा त्या कुटूंबातील एक कमावती व्यक्ती असावी. तसेच ज्या व्यक्तीकडे ५ एकरपेक्षा कमी जिरायती किंवा २.५ एकरपेक्षा कमी बागायती शेत जमीन असतील त्या व्यक्तीला या योजनेतंर्गत भूमीहीन समजण्यात येवून या योजनेमध्ये प्राप्त राहतील. या विविध अटींची पुर्तता करणार्‍या व्यक्तीने या योजनेसाठी गावातील तलाठय़ाशी संपर्क करुन सदस्य होण्यासाठी अर्ज भरावा, त्यानंतर जवळपासच्या महा ई सेवा केंद्रात ऑनलाईन पद्धतीने अर्ज दिला जाईल. अर्जासोबत आधार क्रमांक जोडणे आवश्यक आहे.

Web Title: Aam Aadmi Insurance plan is now available online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.