'प्रहार'च्या आसूड यात्रेचे खामगावात स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 02:31 PM2018-05-25T14:31:15+5:302018-05-25T14:33:16+5:30
खामगाव: शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने काढण्यात आलेल्या शेतकरी आसूड यात्रेचे शुक्रवारी दुपारी खामगावात आगमन झाले. आ. बच्चू कडू यांच्या नेतृत्वात निघालेल्या यात्रेचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात तसेच शेतकरी आणि शेतमजूरांच्या विविध प्रश्नांसंदर्भात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी यवतमाळ येथून या यात्रेला सुरूवात झाली आहे. अकोला मार्गे ही आसूड यात्रा शुक्रवारी दुपारी खामगाव येथे पोहोचली. चांदमारी चौकात या यात्रेचे भव्य स्वागत झाले. त्यानंतर बस स्थानक चौक मार्गे ही आसूड यात्रा नांदुरा रोडवर पोहोचली. जलंब नाक्यापूर्वीच आसूड यात्रा पुन्हा बस स्थानकाकडे आली. जालनाकडे प्रस्थान करण्यापूर्वी खामगाव येथील पत्रकार परिषदेत आ. कडू यांनी शासनावर शाब्दीक ‘प्रहार’केला. आसूड यात्रेच्या निमित्ताने शहरात चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. या शोभायात्रेत प्रहार जनशक्तीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तथा अपंग बांधव मोठ्यासंख्येने सहभागी झाले होते.